टीम महाराष्ट्र देशा : महाराष्ट्रात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांच्या महाराष्ट्र विकास आघाडीने सत्तास्थापन केली आहे. २८ नोव्हेंबर रोजी उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. आता या नव्या सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जावं लागणार आहे.३० नोव्हेंबर व १ डिसेंबर रोजी विधिमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. आज पहिल्या दिवशी विधानसभेत विश्वासदर्शक ठराव मांडला जाणार आहे.
दरम्यान, शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे बंधू राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापन केली. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील निवडून आले. आज होणाऱ्या या विश्वासदर्शक ठरावात पाटील यांनी तठस्थ भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या महिन्याभरात राज्यात घडलेल्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे सरकारसाठी ही मोठी अग्निपरिक्षा असणार आहे. विधानसभेच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून दिलीप वळसे-पाटील कामकाज पाहत आहेत. ही बहुमताची चाचणी उत्तीर्ण होण्यासाठी १४५ आमदारांचा पाठिंबा सरकारसाठी आवश्यक असणार आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याची इच्छा होती.त्यामुळे आता राज ठाकरे यावर काय निर्णय घेतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
https://twitter.com/Maha_Desha/status/1200688998500298752?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1200689981762592768?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

