Share

राम मंदिर निर्माणासाठी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी दिला तब्बल एवढ्या लाखांचा निधी

Published On: 

🕒 1 min read

कल्याण:- अयोध्येतील राम मंदिराच्या निर्मितीसाठी अनेकजण आर्थिक मदत करत आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असलेल्या शिवसेना पक्षाने राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांची मदत केली आहे. मंदिराच्या बांधकामासाठी अनेकजण मदतीचा हात करत आहेत. सूरतच्या एका व्यापाऱ्याने तर तब्बल 11 कोटी रुपये राम मंदिराच्या बांधकामासाठी दिले आहेत.

दरम्यान, अयोध्येतील राम मंदिराच्या बांधकामासाठी मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी 2 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश मदत म्हणून दिला आहे. राजू पाटील यांनी स्वत: आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती दिली आहे. राम मंदिर उभारण्याच्या या पवित्र कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे भाग्य प्राप्त झाले, असं राजू पाटील म्हणाले आहेत

राम मंदिर उभारणीसाठी अनेक दिग्गजांनी देणग्या दिल्या आहेत. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पाच लाखाचा धनादेश दिला होता. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज अयोध्येत होणाऱ्या राम मंदिर निर्माण करण्यासाठी 1 लाख 11 हजार रुपयांचा चेक दिलेला आहे. तर, भाजप खासदार आणि क्रिकेटपटू गौतम गंभीर यांच्याकडून राम मंदिरासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात आलेला आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!