🕒 1 min read
मुंबई : गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने संपूर्ण जगला घातलेला विळखा हा वाढतच आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर केला. या लॉकडाऊनमुळे राज्यातील अनेक सण, उत्सवही रद्द करावे लागले आहेत. आता गणेशोत्सव तोंडावर आला असताना त्यावर पण लॉकडाउनचा परिणाम झालेला दिसत आहे.
गणेशोत्सवासाठी चाकरमानी हे गावी जात असतात. पण कोरोनामुळे चाकरमान्यांच्या गावी जाण्याबाबत अनिश्चितता निर्माण झालेली आहे. आता मनसेनेही गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी सरकारने सवलतीच्या दरात बस उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात राजू पाटील यांनी ट्विट केले असून, त्यात ते म्हणतात की, ‘गणपतींसाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना खासगी बसेस मनमानी भाडे आकारत आहेत. कोकणवासियांसाठी सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध करून दिल्यास तसेच कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्यास या कठीण काळात त्यांना थोडा दिलासा मिळेल’.
गणपतींसाठी कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांना खासगी बसेस मनमानी भाडे आकारत आहेत. कोकणवासियांसाठी सवलतीच्या दरात बसेस उपलब्ध करून दिल्यास तसेच कोकणसाठी विशेष रेल्वे गाड्या सोडल्यास या कठीण काळात त्यांना थोडा दिलासा मिळेल.@CMOMaharashtra @advanilparab @samant_uday @KonkanRailway
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) July 13, 2020
दरम्यान, गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या मुद्द्यावरून भाजपानेही आक्रमक भूमिका घेतली होती. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसाठी ई-पासची अट असू नये अशी मागणी नारायण राणे यांनी केली होती.
सोलापुरात १७ ते २६ जुलैपर्यंत संपूर्ण टाळेबंदी
परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ, आता तरी HRD आणि युजीसीला पटेल का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

