🕒 1 min read
नवी दिल्ली : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसई बोर्डाचा इयत्ता बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. सीबीएसईचे निकाल 15 जुलैपूर्वी जाहीर होऊ शकतात अशी माहिती देण्यात आली होती. त्यानुसार सोमवारी (13 जुलै) बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे यंदा दहावी आणि बारावीची गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येणार नाही. सीबीएसई बोर्डानं दिलेल्या माहितीनुसार यंदा ८८.७८ टक्के विद्यार्थांनी बारावीची परीक्षा पास केली आहे.
Dear Students, Parents and Teachers!@cbseindia29 has announced the results of Class XII and can be accessed at https://t.co/kCxMPkzfEf.
We congratulate you all for making this possible. I reiterate, Student's health & quality education are our priority.
— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) July 13, 2020
दरवर्षीप्रमाणे यंदापण मुलींनी बाजी मारली असून सीबीएसई बोर्डात ९२.१५ टक्के मुली पास झाल्या आहेत. तर त्रिवेंद्रम, बंगळुरू आणि चेन्नईनं यंदा चांगली कामगिरी केली आहे. दिल्ली झोनमधील ९४.३९ टक्के विद्यार्थाी पास झाले आहेत.
Central Board of Secondary Education (CBSE) Class 12 exam results announced. Overall Pass Percentage is 88.78%. pic.twitter.com/MKswRe5NpA
— ANI (@ANI) July 13, 2020
CBSE बोर्डाच्या बारावीचा निकाल पाहण्यासाठी :
cbseresults.nic.in
cbse.nic.in
results.nic.in
सर्वात आधी अधिकृत संकेतस्थळावर जा…
होमपेजवर CBSE बोर्ड रिजल्ट 2020 लिंक दिसेल त्यावर क्लीक करा.
तुमचा बैठक क्रमांक टाकून संबधित माहिती भरा
सबमिट बटन क्लीक केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रीनवर दिसेल.
तयारीला लागा : एमपीएससीच्या परीक्षेची तारीख जाहीर…
‘या’ देशात कोरोनाची लस अंतिम टप्प्यात , 20 कोटी व्हॅक्सिनचे उत्पादन करण्याची तयारी
कोरोना संसर्गाचे प्रमाण देशात 6 तर मुंबईत 28 टक्के, फडणविसांनी व्यक्त केली चिंता
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

