परभणी: जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत परभणी व हिंगोली या दोन्ही जिल्ह्यातील सेवा सहकारी मतदारसंघाच्या सर्व जागांचे निकाल जाहिर झाले आहेत. अटीतटीच्या झालेल्या या निवडणुकीत फोडाफोडीचे राजकारण देखील खुप मोठ्या प्रमाणात पहावयास मिळाले. वरपुडकर गटाला २१ पैकी १२ जागा मिळाल्या आहेत. तर ८ जागा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर गटाला मिळाल्या आहेत.
माजी मंत्री तथा काँग्रेसचे आमदार सुरेश वरपुडकर गटाला ( बिनविरोध धरुन) १२ जागा मिळाल्या तर विरोधी गटाला म्हणजेच माजी आमदार रामप्रसादर बोर्डीकर गटाला ८ जागा निवडून आल्या आहेत. तरीही आता कोणाच्या गटाचा अध्यक्ष होतो, तर उपाध्यक्ष कोणाच्या गटाचा यासाठी देखील मोठे राजकारण होण्याची परिस्थिती आहे. याचे कारणे म्हणजे वरपुडकर गटापेक्षा माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर गटाला केवळ ४ जागा कमी मिळाल्या आहेत. त्यामुळे आता दोन्ही गटामध्ये अटीतटीची चुरस पहावयास मिळणार आहे. हे मात्र नक्की.
परभणीतून वरपुडकर यांच्या गटामधील आमदार स्वतः आमदार सुरेश वरपुडकर, आमदार राजेश नवघरे, माजी आमदार राजेश पाटील गोरेगावकर, , माजी आमदार सुरेश देशमुख, गणेश रोकडे, प्रेरणा वरपुडकर, पंडीतराव चौखट, भगवान वाघमारे, माजी आमदार साहेबराव पाटील गोरेगावकर (बिनविरोध) माजी उपनगराध्यक्ष अतुल सरोदे, बालाजी देसाई, माजी जि. प. अध्यक्ष राजेश विटेकर यांचा निवडून आलेल्या नेत्यांमध्ये समावेश आहे. तर रामप्रसाद बोर्डीकर गटामधून स्वत: माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार मेघना बोर्डीकर, माजी खासदार शिवाजी माने, भाजपचे जिल्हाध्यक्ष आनंद भरोसे, भावना कदम बोर्डीकर, भगवान सानप हे बोर्डीकर पुरस्कृत गटात निवडून आले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- स्वतःला वाघ म्हणवणारे ठाकरे आता पवारांच्या ताटाखालचं मांजर झालेत – भाजप
- सत्ता येताच भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात टाकणार; अमित शहांची बंगालमध्ये घोषणा
- बँक ग्राहकांसाठी महत्वाची बातमी महिना अखेरीस तब्बल ‘इतक्या’ दिवस बँका बंद
- इंग्रजी शिकविण्याच्या मुद्द्यावरून शशी शरूर यांचा पारा चढला
- धनंजय मुंडे यांच्या इशार्यानंतर प्रशासन लागले कामाला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

