🕒 1 min read
मुंबई : सब टिव्हीवरची मालिका ‘तारक मेहता का उलटा चष्मा’ पुन्हा एकदा नव्या वादात सापडली आहे. नुकत्याच प्रसारित झालेल्या एका भागात, या मालिकेतील जेठालालचे वडील बापुजी यांच्या तोंडी, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने यावर अक्षेप घेतला असू सब टिव्हीने याबद्दल माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
या मालिकेत प्रसारित करण्यात आलेल्या भागात प्रत्येक व्यक्ती हा आपल्या मातृभाषेमधूनच संवाद साधणार असा पण करतो. यातून तयार झालेल्या विसंवादामध्ये बापुजी हे पात्र मध्यस्थी करतं आणि सर्वांचं मनोमिलन घडवून आणतं. यादरम्यान…बापुजींच्या तोंडी, मुंबईची भाषा हिंदी असल्याचा संवाद दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे या प्रकरणी आता सब टिव्ही काय भूमिका घेतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, यावर मनसेने कठोर भूमिका घेत हेच ते मराठीचे ‘मारक’ मेहता असल्याचं म्हटलं आहे. तर मुंबईची भाषा मराठी आहे हे माहिती असतानाही मालिकांमधून पद्धतीशीर अपप्रचार सुरु असतो. या गुजराती किड्यांची वळवळ थांबवावीच लागेल. यात काम करणाऱ्या मराठी कलाकारांनाही याची शरम वाटत नाही याचीच शरम वाटत असल्याचं मनसे नेते अमेय खोपकरांनी म्हटलं आहे.
मुंबईची 'आम भाषा' हिंदी नाही, मराठी आहे, हे ह्या सब टीव्हीवाल्यांना मान्य नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या कानाखाली 'सुविचार' लिहावे लागतील! तेसुद्धा मराठीत!
'कानाखाली काढलेले मराठी सुविचार' ह्यांना बरोबर वाचता येतील!! @sabtv pic.twitter.com/tuydzv0kEW— Shalini Thackeray (@ThakareShalini) March 3, 2020
यावर आता मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी या मालिकेवर जोरदार निशाणा साधला आहे. ‘मुंबईची ‘आम भाषा’ हिंदी नाही, मराठी आहे, हे ह्या सब टीव्हीवाल्यांना मान्य नसेल, तर महाराष्ट्र सैनिकांना त्यांच्या कानाखाली ‘सुविचार’ लिहावे लागतील! तेसुद्धा मराठीत! ‘कानाखाली काढलेले मराठी सुविचार’ ह्यांना बरोबर वाचता येतील’! अशा शब्दांत शालिनी ठाकरे यांनी सुनावले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

