टीम महाराष्ट्र देशा : बेरोजगारीच्या मुद्यावरून मनसेने भाजपावर निशाणा साधला आहे. दुसऱ्यांदा सत्तेवर आल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतातली बेरोजगारी ६.१ टक्के, ४५ वर्षातला सर्वाधिक दर असे ट्विट म्हणत त्यांनी भाजपावर टोला लगावला आहे.
कालच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या केंद्रीय मंत्रीमंडळाने मंत्रीपादाची शपथ ग्रहण केली. मोदी सरकारसाठी हा खूप मोठा झटका आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या चौथ्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर घटून ६ टक्क्यांच्या खाली गेला आहे. आर्थिक वर्ष २०१८-१९ च्या चौथ्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर घटून ६ टक्क्यांच्या खाली गेला आहे. नुकताच जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, जानेवारी-मार्च या तिमाहीत देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न(जीडीपी) अवघ्या ५.८ टक्के दराने वाढला असल्याचे समोर आले आहे. मागील आर्थिक वर्षात देशातील बेरोजगारीचा दर ६.१ टक्क्यावर राहिला आहे. जानेवारी महिन्यात ही आकडेवारी लीक झाली होती आणि त्यावेळी बेरोजगारीचा आकडा हा वर्ष १९७२-७३ नंतर पहिल्यांदाच इतक्या वर उसळला गेल्याचे सांगण्यात आले होते.
यामुद्यावरून, मनसेने भाजपावर निशाणा साधला आहे. सत्ताधाऱ्यांकडून सर्व यंत्रणांचा वापर करून माहिती दडपली गेली आहे. मुळ प्रश्नांना बगल दिली गेली पण कितीही झाकलंत तरी विरोधाचा सूर्य उगवणारंच. असे म्हणत दुसऱ्यांदा सत्तेवर आल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतातली बेरोजगारी ६.१ टक्के, ४५ वर्षातला सर्वाधिक दर. असा टोलाही मनसेने लगावला आहे.
सत्ताधाऱ्यांकडून सर्व यंत्रणांचा वापर करून माहिती दडपली गेली, मूळ प्रश्नांना बगल दिली गेली पण कितीही झाकलंत तरी विरोधाचा सूर्य उगवणारंच.
दुसऱ्यांदा सत्तेवर आल्याच्या दुसऱ्याच दिवशी भारतातली बेरोजगारी ६.१ टक्के, ४५ वर्षातला सर्वाधिक दर. #unemployment
।। सत्यमेव जयते ।। https://t.co/m4lH1afOE4
— MNS Adhikrut – मनसे अधिकृत (@mnsadhikrut) May 31, 2019
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

