Share

महाराष्ट्र सैनिकांनो तयार रहा, आता ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईक

Published On: 

मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेमकी काय भूमिका घेणार, याचे उत्तर लवकरच मिळणार असल्याचं दिसत आहे. राष्ट्रवादीशी वाढलेली जवळीक पाहता राज हे महागंठबंधनमध्ये सहभागी होणार असल्याचं बोलल जात आहे. तर आता येत्या ९ मार्च रोजी ‘राज’कीय सर्जिकल स्ट्राईकसाठी महाराष्ट्र सैनिकांनो तयार रहाचे पोस्टर सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.

मागील काही दिवसांपासून राज ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामध्ये तुझ्या गळा माझ्या गळाचे सूर दिसत आहेत. राज ठाकरे यांनी एअर स्ट्राईक आणि पुलवामा ह्ल्याविषयी उपस्थित केलेल्या प्रश्नावर देखील शरद पवार यांनी त्यांची पाठराखण केली. दरम्यान, कॉंग्रेसकडून काहीसा विरोध असला तरी राष्ट्रवादी मात्र मनसेला आघाडीत घेण्यासाठी उत्साही आहे.

राहुल गांधी यांनी मुंबईतील सभेत महागंठबंधनचे दरवाजे सर्वांसाठी खुले असल्याचं सांगितले होते. त्यामुळे मनसेसाठी आघाडीचे दरवाजे खुले झाल्याचं दिसत आहे. दरम्यान, ९ मार्च रोजी मुंबईतील रंगशारदा सभागृहात आयोजित सभेत राजे ठाकरे नेमकं काय बोलणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!