Share

शिवसेनेचा वचनपूर्ती तर मनसेचा नवीन वचनांचा मेळावा

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – २३ जानेवारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचा मुहूर्त साधत महाराष्ट्रात मनसे आणि शिवसेना या दोन्ही पक्षांनी भव्य मेळाव्यांचे आयोजन केले होते.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपले पहिले राज्यस्तरीय महाअधिवेशन आयोजित केले होते. या अधिवेशनात मनसेने आपला नवीन ध्वजाचं अनावरण केलं . तसेच राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांची पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. अधिवेशनाची सांगता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणाने झाली. या भाषणात ठाकरेंनी पक्षाचा हिदुत्ववादी विचारांकडे कल असेल असे संकेत दिले. तसेच नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला पाठींबा देत एकप्रकारे भाजप सोबत आपली जवळीक वाढवण्याचे संकेत दिले. या कायद्याला पाठींबा देण्यासाठी मनसेकडून  लवकरच एक मोर्चाही काढण्यात येणार आहे.

दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंना राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री करू दिलेलं वचन पूर्ण केल्याबाद्दल वचनपूर्ती मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात शिवसेनेच्या वाटचालीत महत्वाची भूमिका पार पाडलेल्या नेते , लोकप्रतिनिधी, मंत्री यांचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही भव्य सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे. तसेच विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात आले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!