🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा: कलम ३७० तर इतर कारणांमुळे भारत व पाकिस्तानमधील संबंध ताणले गेले आहेत. मोदी सरकारच्या कलम ३७० हटवण्याच्या निर्णयानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे व्यापारी संबंध तोडले आहेत. एका बाजूला सत्तेतील मंत्री पाकिस्तान विरोधात भाषणे करत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढण्यात आली आहे.
राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या ‘एमएमटीसी’कडून पाकिस्तानी कांद्याच्या आयातीसाठी निविदा काढण्यात आली आहे. पाकिस्तानी कांदा राज्यात आल्यास स्थानिक शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागू शकते. दिवसांपूर्वीच एमएमटीसीकडून इजिप्त, चीन, पाकिस्तान, अफगाणिस्तानमधून कांदा आयातीसाठी निविदा काढण्यात आली होती.
६ सप्टेंबर रोजी एमएमटीसीकडून काढण्यात आलेल्या निविदेत नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत कांदा हवा असल्याचे म्हंटले आहे. या दरम्यानचं राज्यातील खरीपाचा कांदा बाजारात येतो, त्यामुळे आयात कांदा बाजारपेठेत आल्यास दर कोसळू शकतात.
कांदा आयातीच्या निर्णयावर टीका करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सरकारला धारेवर धरले आहे. खरीपाचा कांदा काढणी महिन्याभरावर आली आहे. अशावेळी पाकिस्तानमधून कांदा आयात करण्याची काय घाई आहे? भारतीय शेतकरी हे आपले शत्रू आहेत का ? असा सवाल शेट्टी यांनी केला आहे.
मेगा गळती लागली असल्याने विरोधकांनी केवळ आता आत्मचिंतन करावे’
POKवर हल्ला करण्यासाठी लष्कर सज्जच आहे : लष्करप्रमुख बिपीन रावत
‘शरद पवार, अजिदादा भाजपात येतील की काय अशी शंका वाटायला लागलीय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

