भोपाळ : आमच्या एका आमदाराला २५ ते ३५ कोटी रुपयांची ऑफर दिली जात आहे. ५ कोटी आता घ्या, दुसऱ्या टप्पा राज्यसभा निवडणूक आणि तिसऱ्या टप्प्यात संपूर्ण रक्कम सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी देऊ, असं सांगितलं जात आहे, असा आरोप मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केला होता.
मध्य प्रदेशमध्ये काँग्रेस आमदारांना विकत घेण्यासाठी मध्य प्रदेश भाजपकडून घोडेबाजार केला जात आहे, असा आरोप देखील माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी केला होता. काँग्रेसने केलेल्या या आरोपामुळे राज्यात एकाच खळबळ माजली होती.
याच पार्श्वभूमीवर दिग्विजय सिंह यांच्या आरोपावर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. याबाबत ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘आमदारांना जर फुकटचा पैसा मिळत असेल तर त्यांनी घ्यावा असं विधान त्यांनी केलं आहे. आमदारांनी मला सांगितलं आम्हाला इतके पैसे देण्याची ऑफर देत आहेत. मी आमदारांना फुकटचे पैसे मिळत असतील तर घ्यायला हवे असं सांगितलं आहे अशी माहिती त्यांनी दिली.
दरम्यान, शिवराजसिंह चौहान आणि नरोत्तम मिश्रा यांच्यात मुख्यमंत्री होण्यासाठी मतभेद होते. मात्र आता त्यांनी एकमत केलं असून जर त्यांना राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी पुरेसे संख्याबळ मिळालं तर चौहान यांना मुख्यमंत्री केले जाईल आणि मिश्रा यांना उपमुख्यमंत्री बनतील असं ठरलं आहे असा आरोप दिग्विजय सिंह यांनी केला केलाय.


