औरंगाबाद : माझी राजकीय पार्श्वभूमी नव्हती मी आमदार खासदार मंत्री होईल असे स्वप्नातही वाटले नव्हते. मात्र कार्यकर्त्यांचे व मतदारांचे प्रेम, आशिर्वादामुळे मी इथपर्यंत मजल मारली. असे प्रतिपादन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केले. रेल्वे राज्यमंत्री झाल्यानंतर सिल्लोड येथील स्वास्तिक लॉन्स येथे त्यांचा नागरी सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना दानवे म्हणाले की, मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन हा प्रकल्प लवकरच कार्यान्वित करु. या ट्रेनमुळे नागपूर ते मुंबई अंतर पावणे दोन तासात कापता येणार आहे. त्यामुळे ही दोन्ही शहरे जवळ येऊन प्रवाशांची सोय होऊन उद्योग व्यापार वाढणार असल्याचेही ते म्हणाले.
माझ्या मंत्री पदामुळे सिल्लोड-भोकरदनला मंत्रिपद मिळाले. त्यामुळे माझ्यावर मोठी जबाबदारी आली आहे. या मंत्रालयाचा व्याप मोठा असल्याने मला पहिल्यासारखे मतदारसंघात फिरता येणार नाहीत त्यामुळे मतदारांनी कार्यकर्त्यांनी आपाआपली गावे सांभाळावी. भाजपाचे विचार कार्य सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचवावे. या महाविकासआघाडी सरकारने आरक्षणाची बाजू चांगली मांडली नाही.
त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळू शकलेले नाही. १२७ व्या घटना दुरुस्तीनुसार आता आरक्षण देण्याचे अधिकार राज्य सरकारच्या आहेत त्यामुळे सर्वेक्षणात नंबर एक ठरलेल्या मुख्यमंत्र्यांनी आता मराठा समाजाला आरक्षण द्यावे. केंद्र सरकारने या मतदारसंघात शेकडो कोटी रुपयांची रस्त्यांची कामे केली आहेत. त्याचबरोबर सिल्लोड सोयगाव तालुक्यातील रस्त्यांसाठी पंतप्रधान सडक निधीतून १९ कोटी रुपये मंजूर केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुळेच जगात सर्वात जास्त प्रगती करणारा देश ठरल्याचे त्यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- शिक्षक मंत्र्यांना अप्रत्यक्ष टोला, ‘दार उघड बये, आतातरी दार उघड’!
- ‘विलासराव म्हणाले होते, हा अतिशय चालू पुरजा’, नाना पटोलेंचा शिवसेनेच्या सत्तारांवर निशाणा!
- ‘पांडेजी’ करमाडपर्यंत पोहचलेली स्मार्टसिटी बस बेगमपुऱ्यात कधी पोहचेल?
- वरुणराजा बरसला; पावसासाठी तरसलेला बळीराजा अखेर सुखावला!
- उशिरा का होईना पंकजा मुंडेंकडून ‘जादूच्या कांडी’चा वापर, फडणवीसांसाठी चिंतेचा विषय?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

