Share

आमदार अन् मंत्री देखील जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासाठी इच्छुक

Published On: 

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदासाठी राज्यमंत्रीमंडळातील मंत्री संदीपान भूमरे तसेच मंत्री अब्दुल सत्तार देखील इच्छुकांच्या यादीमध्ये असल्याची माहिती समोर आली आहे. तर शेतकरी विकास पॅनेलच्या सर्वाधिक म्हणजेच १५ जागा मिळाल्या आहेत.

परंतू सर्वाधिक जागा मिळुन देखील नितीन पाटील हे अध्यक्ष पदासाठी दावेदार आहेत. तर गुरुवारी मुंबईमध्ये मातोश्रीत जावून नितीन पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे.आता शेतकरी विकास पॅनल पाटील यांना मदत करणार का ?  नाही? ही मोठी अडचणी त्यांच्या मार्गामध्ये अजुनही आहेत. शिवसेनेचे दोन मंत्री आमदार, राष्ट्रवादीचे आमदारांनी विश्वासघात करुन शेतकरी विकास पॅनलच्या संस्थापक विधानसभेचे माजी अध्यक्ष आमदार हरिभाऊ बागडे यांच्याशी संघान बांधून शिवसेनेची गद्दारी केल्याचा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला. त्यामुळे आता महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडून आलेल्या संचालक देखील काय निर्णय घेतात यावर सर्व अध्यक्षपदाबाबतची दिशा अवलंबून आहे.

तर आता ५ एप्रिल रोजी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडीबाबतची सभा घेण्यासाठी निवडणुक अधिकारी डॉ. मुकेश बारहाते यांनी कोरानाचे सर्व नियम पाळुन तसेच सोशल डिस्टंन्सनुसार बैठकीची व्यवस्था करण्यात येणार असल्याचे या वेळी सांगितले आहे. तर आता बैठकीदरम्यान नितीन पाटील हे अध्यक्ष पदाचे उमेदवार असतील असे मंत्री अब्दुल सत्तार यांनी पत्रकार परिषदेत घोषीत केले होते. तर आता अब्दुल सत्तार तसेच संदीपान भूमरे हे देखील अध्यक्ष पदासाठी उत्सूक असल्याची माहिती समाेर आली आहे. तर आता नितीन पाटील यांच्या शिवसेना प्रवेशामुळे खुप मोठे बदल होणार असल्याचे राजकीय जाणकारांनी सांगितले.

आता नितीन पाटीलसह शिवसेनेचे हे दोन्ही मंत्री अध्यक्षपदासाठी एेनवेळी खेळी खेळु शकतात. तर आता महाविकास आघाडीचे अधिकृत पॅनेल काय निर्णय घेते हे पहाणे महत्वाचे ठरणार आहे. यातच गुरुवारी नितीन पाटील यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करत शिवसेनेचे शिवबंधन बांधले आहे. आता परिस्थिती खुप मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे हे मात्र नक्की.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!