🕒 1 min read
बीड: राज्यात सध्या सर्वत्र ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असताना नाशिक मध्ये ऑक्सिजनचे मोठ्या प्रमाणावर लिकेज झाले. रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्यातील रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सिविधांचा तुटवडा जाणवत आहे तसेच ऑक्सिजनची कमतरता तर त्याहून जाणवतच आहे. बीड जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत आहे, त्यामिले तिथेही ऑक्सिजन अपुरे पडत आहे. मात्र गुरुवारी पोलिसांच्या बंदोबस्तात बीड जिल्हा रुग्णालयात १० टन ऑक्सिजन बीडला पोहोचले आहे.
जिल्ह्यात सध्या ऑक्सिजनचा तुटवडा आहे. बुधवारी जिल्ह्याला पंधरा मेट्रिक टन ऑक्सिजन मिळाला होता त्यानंतर गुरुवारी दुसऱ्या दिवशी पुण्याहून आणखी १० टन ऑक्सिजन मिळाला. पोलिस बंदोबस्तात हा टँकर सायंकाळी बीडमध्ये आणला गेला. जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांच्या आदेशानुसार अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे व उपविभागीय अधिकारी नामदेव टिळेकर, तहलिदार शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली १० पैकी २ केएल ऑक्सिजन बीड जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन टँकमध्ये दिला गेला तर, दोन एजन्सीला प्रत्येकी ४ केएल लिक्विड ऑक्सिजन दिला गेला.
बीडचे नायब तहसीलदार सुरेंद्र डोके यांच्या निगरानीखाली हा टँकर उतरवला गेला. जिल्हा रुग्णालयाला २ केएल ऑक्सिजन मिळाल्याने खासगी एजन्सीतून ऑक्सिजन आणण्याचा पाच ते सहा तासांचा वेळ वाचणार आहे. दरम्यान, ऑक्सिजनचा तुटवडा पाहता कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पोलिस बंदोबस्तही दिला गेला होता. राज्यात तसेच बीड जिल्ह्यात कोरोनाची भीषण परिस्थिती बघयला मिळत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना नियम पाळत स्वतःची व आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे तसेच प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सातत्याने होत आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘पवारसाहेब तुम्ही काही करू नका, नाहीतर तुमचे साखर कारखाने हवेतील ऑक्सिजन पण सोडणार नाहीत’
- ‘शरद पवारांना आपत्कालीन परिस्थितीत काम करण्याचा उत्तम अनुभव त्यांचा एक फोन चित्र पालटू शकतो’
- राज्याच्या ऑक्सिजन संकटात आता शरद पवार मैदानात; साखर कारखान्यांना लिहिलं पत्र
- सेवानिवृत्त धारकांचे महिन्याच्या पाच तारखेच्या पेन्शन करा- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदवले
- भाजपचे किती लोकप्रतिनिधी मला भेटतात हे एकदा तपासा, अजितदादांचा चंद्रकांतदादांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
