नाशिक : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे नागरी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी भुजबळ यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. विशेष म्हणजे आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे असल्याचा दावाही केला आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
एका बाजूला हे सर्व सुरु असताना दुसऱ्या बाजूला छगन भुजबळांविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून शिवसेना आमदार सुहास कांदे यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, कांदे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्र दिल्याचे समजते. याआधी देखील पुरग्रस्तांच्या मदतनिधीवरून छगन भुजबळ आणि कांदे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे एकत्र सरकार असताना देखील राष्ट्रवादीचे नेते असलेल्या भुजबळ यांच्याविरोधात आरोप केले आहेत.
दरम्यान,आमदार सुहास कांदे यांना धमकी आल्यानंतर नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी याप्रकरणी तात्काळ कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांना दिले आहे. आमदाराला धमकी येणं ही बाब गंभीर आहे. मंत्रीमंडळाची बैठक सुरू असताना याबाबत कळल्यानंतर आपण यासंदर्भात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना माहिती दिल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं. तसेच महाराष्ट्रातील कोणत्याही लोकप्रतिनिधीला धमकी देण्याचे प्रकार राज्य सरकार सहन करणार नाही. दोषींवर कडक कारवाई करण्याची गरज आहे, असं भुजबळ म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
- पराभवाची साखळी मोडत मुंबई इंडियन्सचा पंजाबवर दणदणीत विजय
- भुजबळांविरोधातली याचिका मागे घ्या; शिवसेना आमदाराला अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीची धमकी
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- ‘ईडीला उत्तरं देणं ही माझी जबाबदारी मात्र कुणा वैयक्तिक व्यक्तीला उत्तर देण्यास मी बांधील नाही’
- सातत्याने जावयाचं नाव घेऊ नका, हे काही बरोबर नाही; हसन मुश्रीफ संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

