Share

मनसेला जबरदस्त धक्का,’एकुलता एक’ आमदार करणार शिवसेनेत प्रवेश

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : जुन्नरचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार शरद सोनवणे यांचा शिवसेनेत प्रवेश निश्चित झाला आहे. उद्या दुपारी 2 वाजता आमदार सोनवणे हे शिवसेनेत प्रवेश करणार आहेत,मुंबईतील शिवसेना भवनात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.

दरम्यान,सोनावणे शिवसेनेत येण्याआधी ‘मोतीश्री’वर त्यांना विरोध करण्यासाठी जुन्नरच्या जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके मोताश्रीवर गेल्या होत्या. शरद सोनावणे यांना पक्षात घेण्याआधी शिवसैनिकांना विश्वासात घेतलं जाईल, असं आश्वासन पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आशाताईंना दिलं होतं. आशाताई यांनी याआधी 2014 साली जुन्नर विधानसभा निवडणूक लढवली होती.

कोण आहेत शरद सोनवणे ?

शरद सोनवणे हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर विधानसभा मतदारसंघातून मनसेचे आमदार आहेत. मनसेचे ते एकमेव आमदार होते. गेल्या विधानसभा निवडणुकीवेळी शिवसेनेत उमेदवारी नाकारल्याने शरद सोनवणे यांनी मनसेत प्रवेश केला होता आणि ते जिंकूनही आले होते.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!