Share

…तर किमान 25 ते 30 हजार मताधिक्याने मी करमाळ्याचा आमदार झालो असतो – संजय शिंदे

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- विधानसभा निवडणुकीत करमाळा मतदारसंघातून विजयी झालेले अपक्ष आमदार संजय शिंदे यांनी सुरुवातीला भाजपला पाठिबा दिला. मात्र, आता राज्यामध्ये ज्यांची सत्ता येईल त्यांना पाठिबा देणार असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यात सत्तास्थापनेचा निर्णय अधांतरीच राहिल्याने भाजपाच्या दारात घुटमळणाऱ्या अपक्ष चलबिचल होताना दिसत आहेत.

2019 ची लोकसभा निवडणूक लढण्याचा माझा निर्णय चुकला, लोकसभा निवडणूकीतील पराभवामुळे कार्यकर्त्यांच्या आत्मविश्वासावर परिणाम झाला. ही निवडणूक मी लढलो नसतो तर किमान 25 ते 30 हजार मताधिक्याने मी करमाळ्याचा आमदार झालो असतो, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

दरम्यान,सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील महत्वाचे नेते म्हणून संजय शिंदे यांच्याकडे पहिले जाते. आजवरची त्यांची राजकीय कारकीर्द हि कायम दोन डगरीवर हात ठेऊन चालण्याची राहिली आहे. विधानसभा निवडणुकीत स्वबळासह राष्ट्रवादीच्या पाठिंब्यामुळे शिंदे यांचा विजय झाला आहे. करमाळा मतदारसंघात त्यांनी अपक्ष नारायण पाटील आणि शिवसेनेच्या रश्मी बागल यांचा पराभव केला.

निवडून येताच संजयमामा शिंदे यांनी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. राज्यात महायुतीला बहुमत मिळूनही भाजप-शिवसेना यांच्यातील सत्तासंघर्षांत सत्तास्थापनेचा निर्णय अधांतरीच राहिला आहे.

महत्वाच्या बातम्या 

https://twitter.com/Maha_Desha/status/1191701022713896962?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191705932176084992?s=20

https://twitter.com/Maha_Desha/status/1191707660795559936?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!