Share

‘मोदी सरकारचे ओबीसींवरचं प्रेम बेगडी’, प्रा. हरी नरकेंचा आरोप

Published On: 

पुणे : ओबीसी आरक्षणासंदर्भात इम्पेरिकल डेटावरून मोदी सरकार आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यातील लढाई आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाचील प्रतिज्ञापत्रात केंद्र सरकारची डेटा देण्यासंदर्भातली तयारी दिसत नसल्याचे आज स्पष्ट झाले आहे. प्रशासकीय कारणे आणि त्रुटींचा हवाला देत इम्पॅरिकल डेटा देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. केंद्राच्या या प्रतिज्ञापत्रावर रिजाँईंडर दाखल करण्यासाठी राज्य सरकारने चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे. चार आठवड्यानंतर या प्रकरणावर पुढची सुनावणी होणार आहे.

याच पार्श्वभूमीवर प्रा.हरी नरके यांनी मोदी सरकारवर ‘मोदी सरकारचे ओबीसींवरचं प्रेम बेगडी’ असल्याचा आरोप केला आहे. यासंदर्भात अधिक बोलत नरके म्हणाले की,’आज सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षण इम्पेरिकल डेटासंदर्भात सुनावणी झाली. २०११ चा डेटा राज्य सरकारने केंद्राला मागितला होता. परंतु केंद्राने शपथपत्राद्वारे तो देण्यास नकार दिला आहे. राज्य सरकारने जी याचिका दाखल केलेली होती त्या संदर्भात केंद्राने म्हणणे सादर करायला एक महिन्याचा वेळ घेतला. प्रतित्रापत्र दाखल करायला एक दोन तीन दिवसाचा वेळ त्याला एक महिना लावला’ असे नरके म्हणाले.

तसेच आता केंद्र सरकार सांगतंय जातनिहाय जनगणनेत चुका आहेत, असे केंद्र सरकार सांगतंय.मात्र जी चूक सुधारण्यासाठी पानगरीया यांची समिती नेमली होती त्याची एकही बैठक झाली नाही आणि घेतली नाही. केंद्र सरकार डेटा का देत नाही ? मोदी सरकारचे ओबीसींवरचं प्रेम बेगडी आहे,असे म्हणत केंद्र सरकारच्या निर्णयावर नरके यांनी टीका केली आहे.

दरम्यान, राज्य सरकारचा अध्यादेशाद्वारे ओबीसी आरक्षण काही प्रमाणात देण्याचा प्रयत्न आहे. अध्यादेश सुधारित करुन राज्यपालांकडे पाठवला आहे. राज्यपाल त्यावर राज्यपाल निर्णय घेतील ही अपेक्षा असल्याचे राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!