मुंबई : बॉलीवूडच्या पडद्यावरील कहाण्याच केवळ मजेदार नसतात, तर पडद्या मागील गोष्टीं देखील सिनेमापेक्षा काही कमी नसतात. २३ सप्टेंबर १९४३ ला जन्माला आलेल्या ‘तनुजा’ चा आज ७८ वाढदिवस आहे. याप्रसंगी तिच्या आयुष्यात घडलेला आठवणीतील एक किस्सा…
सिनेसृष्टीतील ६० आणि ७०च्या दशकात लोकप्रिय अभिनेत्री तनुजा आणि बॉलीवूडचा ही-मॅन धमेंद्र या दोघांचे नाव प्रसिध्द होते. या दोघांनी अनेक चित्रपट केले. ‘चाँद और सूरज’ , बहारें फिर आएंगी, इज्जत सारख्या चित्रपटात सोबत काम करत, ते चांगले मित्र ही बनले होते. मात्र तनुजाने धमेंद्रला चोप देत केवळ थप्पड मारलं नाही, तर बेशरम देखील बोलली होती.
दरम्यान १९६५ मध्ये ‘चाँद और सूरज’ चित्रपटाची शूटिंग सुरू होती. दोस्ती झाल्यानंतर त्यांच्यात गंमती गंमती सुरू असायच्या. मात्र एके दिवशी नशेत असतांना धमेंद्र तिच्यासोबत फ्लर्ट करण्याचा प्रयत्न करत होते, हे तिला आवडले नाही. तनुजाने त्यांना थप्पड मारलं. पत्नी असतांना अशी हरकत करत असल्यानं त्यास बेशरम आहेस का असं ही म्हणाली होती. यानंतर धमेंद्र यांना या घटनेमुळे लाजल्यासारखं झालं. त्यानंतर तनुजा म्हणाली तुला माझा भाऊ बनवेल. या गोष्टीवर धमेंद्र देखील राजी झाले होते. यानंतर ही या दोघांनी ‘इज्जत’, ‘दो चोर ‘ या सारख्या चित्रपटात सोबत काम ही केले आहे. यानंतर दोघांच्या मुलांनी एकमेंकांसोबत काम केलेले आहेत. अशा गंमती जमंती पडद्यामागे खूप मजेशीर कहानी असू शकते हे ही तितकच खरं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘महाविकास आघाडीच्या एकीवर काँग्रेसला विश्वास नाही का?’, ‘त्या’ भेटीवर सेना-राष्ट्रवादीत नाराजीची चर्चा
- ‘मोदी सरकारचे ओबीसींवरचं प्रेम बेगडी’, प्रा. हरी नरकेंचा आरोप
- ‘तुला काय फरक पडतोयं’; सामन्यापूर्वी केकेआरचा रोहितला न खेळण्याचा सल्ला
- काँग्रेसचे जेष्ठ नेते शरद रणपिसे यांचे पुण्यात निधन
- जॅकी उर्फ ‘जग्गुदादा’ची टपोरी भाषा ऐकायला मिळणार ; ‘बिग बी’सोबत चाहत्यांमध्ये उत्सुकता


