Share

#जिद्द: डोंगरावर जाऊन शिक्षण घ्यावे लागत असलेल्या ‘त्या’ तरुणीची प्रधानमंत्री कार्यालयाने घेतली दखल

Published On: 

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील दारिस्ते येथील गावातील एका मुलीच्या जिद्दीला राज्यभरातून आता सलाम केला जात असून तिच्या अभ्यासाच्या सोयीसाठी अनेकांनी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे. स्वप्नाली सुतार ही तरुणी ऑनलाईन अभ्यासासाठी गावातील डोंगरावर झोपडीत ऑनलाईन अभ्यासाचे धडे गिरवत आहे.

ही बातमी वाऱ्याच्या वेगाने सर्वदूर पसरल्यानंतर थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यालयाने या तरुणीच्या जिद्दीची दखल घेत, तिच्या गावात हायस्पीड इंटरनेटची उपलब्धता करून देण्यात आली आहे. सुरुवातीला डीडी सहयाद्री या वाहिनीने हे वृत्त प्रसिद्ध केले, यानंतर ते करोडो लोकांनी शेअर केले. आता, प्रधानमंत्री कार्यालयाने भारत नेट योजनेअंतर्गत स्वप्नालीच्या दारिस्ते गावात अवघ्या काही दिवसात केंद्र शासनाकडून हायस्पीड इंटरनेट जोडून देण्यात आले आहे.

पुण्यातील जम्बो कोविड सेंटर अखेर सुरु!

12 वी नंतर गावातून पशुवैद्यकीय पदवीच शिक्षण घेण्यासाठी मुंबईत गेली. मुंबईतील दिवा भागात भावांसोबत राहत होती. मात्र, कोरोनामुळे देशात लॉकडाऊन झाल्यामुळे ती गावी आली. गावात आल्यानंतर काही दिवसांनी ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु झाला. तीचं दारिस्ते हे गाव तसं दुर्गम खेडेगाव असलेला भाग. ऑनलाईन अभ्यास सुरु झाल्याने गावात इंटरनेट मिळत नसल्याने आजूबाजूला, डोंगरात तिने इंटरनेट कुठे मिळत का? याचा शोध घेतला. उंच डोंगरात तिला इंटरनेट मिळालं होत.

‘शरद पवार साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण टिकवण्याबाबत शब्द द्यावा’

यानंतर तिने तिथेच छोटीशी झोपडी उभी करत ऑनलाइन वर्गांना उपस्थिती लावण्यास सुरुवात केली. आता, थेट तिच्या गावात नेट उपलब्ध करण्यात आल्यामुळे तिचे स्वप्न पूर्ण होण्यास बळ मिळाले आहे. तसेच, या घटनेने अनेक विद्यार्थी व अन्य व्यक्तींना देखील खूप मोठी प्रेरणा मिळाली आहे.

मराठा आरक्षण : आरक्षणाचा मुद्दा मोठ्या खंडपीठाकडे जाणार? सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!