🕒 1 min read
नागपूर : गत तीस वर्षांपासून रखडलेल्या बडनेरा वाशीम रेल्वेमार्गाची निर्मिती जलद गतीने व्हावी अशी विनंती बडनेरा-वाशीम रेल्वे मार्ग कृती समितीच्या वतीने राम पाटील ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मध्य रेल्वे मंडळाचे अध्यक्ष पद्मश्री खासदार डॉ. विकास महात्मे यांच्याकडे केली आहे.
गत तीस वषार्पासून प्रलंबित असलेला बडनेरा-वाशीम हा १०८ किमीचा रेल्वेमार्ग खऱ्या अर्थाने विदर्भाच्या विकासाचा राजमार्ग ठरु शकतो. नरखेड-बडनेरा-वाशीम या रेल्वे मार्गामुळे दक्षिण उत्तर राज्यामधील अंतर सुमारे १०० किलोमिटरने कमी होणार असून, वेळेतही बचत होईल.
विशेष म्हणजे केंद्र सरकारने सन २०१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पात बडनेरा-वाशीम रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला नव्याने मंजुरात दिली होती. मध्य रेल्वेने सन २0१६-१७ मध्ये या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेक्षणाचे काम होती घेतले होते. सर्व्हेक्षणाचे कामकाज लवकर पुर्ण व्हावे, यासाठी गेल्या वर्षभरापासून सातत्याने बडनेरा – वाशीम रेल्वे मार्ग कृती समिती व जिल्ह्यातील अन्य घटक प्रयत्न करीत आहे. त्याच प्रमाणे हा रेल्वे मार्ग व्हावा यासाठी केंद्रीय दळवळण मंत्री नितीन गडकरी व नागपुर रेल्वे मंडळ समितीचे अध्यक्ष पद्श्री डॉ. विकास महात्मे यांनी पुढाकार घेतला आहे. रेल्वे मागार्चे सर्व्हेक्षण नुकतेच पुर्ण झाले असून, या सर्व्हेक्षणाला रेल्वे बोर्ड व केंद्र शासनाची मंजुरात आवश्यक आहे. त्यामुळे या रेल्वे मागार्संदर्भात आपल्या जिल्ह्याची मागणी त्यांच्याकडे नोंदविणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्ह्यातील ग्रामपंचायतीने बडनेरा-वाशीम रेल्वे मागार्संदर्भात ठराव घेवून बडनेरा-वाशीम रेल्वे मार्ग कृती समितीकडे द्यावेत. जेणकरुन सदर सर्व्हेक्षणाला मंजुरात मिळून निधी उपलब्द होईल. ठराव घेण्यासंदर्भात सरपंच, सचिव किंवा कुणालाही काही माहीती, हवी असल्यास त्यांनी कृती समितीशी संपर्क साधावा, असे आवाहन देखील राम पाटील ठाकरे यांनी केले आहे.
दिलासादायक: राज्यात कोरोनामुक्तांचा आकडा ५ लाखांपार
मराठा आरक्षण : आरक्षणाचा मुद्दा मोठ्या खंडपीठाकडे जाणार? सुप्रीम कोर्टात महत्वाची सुनावणी
‘शरद पवार साहेबांनी मराठा समाजाला आरक्षण टिकवण्याबाबत शब्द द्यावा’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
