🕒 1 min read
बीड : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी सध्या देशात लॉकडाऊन सुरु आहे. तसेच यामुळे अन्नधन्याप्रमाणेच व्यक्तींना व्यक्तिगत समस्यांना देखील सामोरे जावे लागत आहे. लॉकडाऊनमुळे विविध घटकांसमोर विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. सर्वाना उद्भवलेली समस्या म्हणजे वाढलेल्या केसांचा प्रश्न…
याच पार्श्वभूमीवर आमदार नमिता मुंदडा यांनी स्वत: कैची घेऊन पती अक्षय मुंदडा यांच्या वाढलेल्या केसांचा प्रश्नही स्वत:च सोडविला आहे. याबाबत बायको ने आज माझा परफेक्ट हेअरकट केला, अशी पोस्ट कटींगच्या फोटोसह अक्षय मुंदडा यांनी फेसबुकवर टाकली आहे.
तसेच आ. नमिता मुंदडा यांनी हातात कैची घेऊन अक्षय मुंदडा यांच्या डोक्यावरचे केस कमी केले. डोक्यावर वळवळ करणारे केस कमी झाल्याने अक्षय मुंदडा यांनी आमदार पत्नी नमिता मुंदडांचे कौतुक केले.
https://www.facebook.com/mundadaakshay/posts/2936828403027574
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मतदार संघातील रुग्णालयातील डॉक्टर्स, नर्स आदींना पीपीई किटसह मास्क, सॅनिटायझर या सुरक्षा उपकरणांसाठी ५० लाख रुपयांचा निधी आमदार नमिता मुंदडा यांनी दिला आहे. तसेच कोरोना लढ्यासाठी एक महिन्याचे वेतनही दिले आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
