🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा- आज पुन्हा एकदा भाजपमध्ये मेगाभरतीचा कार्यक्रम पार पडला आहे. आजच्या मेगाभरतीत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार असलेले गोपीचंद पडळकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यासोबतच शिरपूरमधील काँग्रेसचे आमदार काशीराम पावरा यांनी देखील कमळ हाती घेतलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश करण्यात आला आहे.
मुंबईतील गरवारे क्लबमध्ये सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.शिरपूरचे आमदार काशीराम पावरा भाजपमध्ये दाखल झाल्यानं काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. पावरा काँग्रेसचे वरिष्ठ नेते अमरिश पटेल यांचे खंदे समर्थक मानले जातात. त्यामुळे पटेलदेखील लवकरच भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी तसे संकेतदेखील दिले आहे. अमरिश पटेल 2 दिवसात भाजपमध्ये येणार असल्याचं पाटील म्हणाले. आमदार आले की त्यांच्या नेत्यांना यावंचं लागतं, असं विधान या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यामुळे अमरिश पटेल लवकरच कमळ हाती धरण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे सहा आमदार आज भाजपत दाखल होणार असल्याची माध्यमांत चर्चा सुरु होती. पण केवळ दोघांनीच आज प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष पाटील यांनी येत्या दोन दिवसांत आणखी एक मेगाभरती होणार असल्याचे कार्यक्रमाच्या सुरुवातीला सांगितले. त्यामुळे पक्षांतरासाठी चर्चेत असलेल्या संभाव्य आमदारांपैकी काहीजण भाजपत येण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1178616083957157889?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178615714334199808?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1178615286225747970?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
