पळसप:- दिवंगत आमदार वसंतराव काळे यांच्या १५ व्या समृतीदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात चांगलीच राजकीय जुगलबंदी रंगली. मी तीन वेळा आमदार झालो, पण मंत्रीपद मिळाले नाही, बनसोड पहिल्यांदाच निवडून आले अन् मंत्रीही झाले, असा चिमटा मराठवाडा शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे यांनी काढला.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून सलग तीनदा निवडून आल्याबद्दल महिनाभरापुर्वी औरंगाबादेत आमदार सतीश चव्हाण यांचा राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला होता. या कार्यक्रमात देखील विक्रम काळे यांनी मला किंवा सतीश चव्हाण यांना मंत्री करा, किती दिवस वाट पहायची असे म्हणत मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा काळे यांनी आपल्या मनातील खंत राज्यमंत्री बनसोडे यांच्या समोर व्यक्त केली.
विक्रम काळे यांच्या वक्तव्यावर राज्यमंत्री बनसोडे यांनी देखील तुम्हाला मंत्री करण्यासाठी प्रयत्न करतो, अशी गुगली टाकली. तसेच माजी आमदार वैजिनाथ शिंदे यांना उद्देशून ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आला असता तर आतापर्यंत मंत्री झाला असता. मी योग्य वेळी निर्णय घेतला, राष्ट्रवादीत आलो आणि मंत्री झालो. वैजिनाथ शिंदे यांनाही मी सोबत आणत होतो, पण ते आले नाही, अन्यथा ते ही मंत्री झाले असते.
महत्वाच्या बातम्या
- ‘लोकशाहीविरोधी व्यवहारामुळे झालेले नुकसान क्रिकेटपटूंनी केलेल्या ट्विट्समुळे भरून निघणार नाही’
- मोठी बातमी : काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रिपद देण्याच्या शिवसेनेच्या हालचाली
- इंधनाचे दर गगनाला भिडले असताना विरोधक झोपी गेले आहेत का ?
- मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांच्या दौरा; नव्या घोषणा होण्याची शक्यता
- ट्रॅक्टर रॅलीत दगावलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियंका गांधी रवाना

