Share

Bhagat Singh Koshyari | “अशांना राज्यपाल पदावर ठेवून उपयोग नाही…” ; शिंदे गटातील आमदाराची खोचक टीका

Published On: 

🕒 1 min read

Bhagat Singh Koshyari |   मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी (Sudhanshu Trivedi) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर (Chhatrapati Shivaji Maharaj) केलेल्या वक्तव्यामुळे भाजप बॅकफूटवर आली आहे. या दोघांच्या वक्तव्यावर भाजपचे बहुतांश नेते मौन बाळगून आहेत. या मुद्द्यावर विरोधी पक्षनेते चांगलेच आक्रमक असताना दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या दोघांचीही पाठराखण केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांनी देखील यावर गोलमाल उत्तरे दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय भूमिका घेतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान शिंदे गटातील आमदाराने राज्यपालांच्या वक्तव्याचा विरोध केला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांबाबत राज्यपालांनी तीन ते चार वेळेस ऐकेरी भाषेचा उल्लेख केला. ज्या राज्यपालांना राज्याचा इतिहास माहित नाही, अशांना राज्यपाल पदावर ठेवून उपयोग नाही. त्यांना कुठेही घेऊन जा, राज्याच मराठी मातीतील माणूसचं राज्यपाल म्हणून ठेवाव”, अशी मागणी बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी केंद्रीय भाजप नेत्यांकडे केली आहे. “छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार कधीही जुना होऊ शकत नाही आणि त्यांची जगातल्या कुठल्याही महापुरुषासोबत तुलना देखील होऊ शकत नाही”, असेही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

विरोधक आक्रमक!

अमोल मिटकरी (Amol Mitkari) म्हणाले, “राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) व भाजप प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली पाठराखण निश्चितच प्रत्येक शिवप्रेमींना दुःखदायक वाटणारी आहे. त्यांच्या भूमिकेचे समर्थन कशासाठी?”

विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी देखील कोश्यारींवर निशाणा साधला आहे. ३ वर्षे महाराष्ट्रात राहूनही राज्यपालांना महाराष्ट्रातील जनतेच्या भावना समजत नसतील तर त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपालपदी राहू नये, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीसांनी केली राज्यपालांची पाठराखण – 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, जोपर्यंत सूर्य, चंद्र आणि पृथ्वी आहे तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे, देशाचे आणि आपल्या सर्वांचे आदर्श राहतील. आजच्या काळात छत्रपती शिवाजी महाराज आमचे हिरो आहेत. याबाबत कोणाच्याही मनात शंका नाही. याबाबत राज्यपालांच्या मनात काही शंका असेल असे मला वाटत नाही. त्यामुळे राज्यपालांच्या शब्दांचा निश्चितच चुकीचा अर्थ काढला गेला आहे, असे मला वाटते.

त्याचबरोबर सुधांशू त्रिवेदींच्या वक्तव्यावर भाष्य करताना फडणवीस म्हणाले की, मी त्रिवेदी यांचे वक्तव्य नीट ऐकले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची माफी मागितली आहे, त्यावर ते काहीही बोलला नाही.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!