Share

‘मिशन कवच कुंडल’; औरंगाबादेत सात दिवसात २९ हजार जणांचे लसीकरण पूर्ण

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची गती वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल सुरू करण्यात आले आहे. गेल्या सात दिवसात या मोहिमेत २९ हजार जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. ११ हजार ५७० जणांनी पहिला तर १८ हजार २७९ जणांनी दुसरा डोस घेतला असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले.

कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी महापालिकेला १० लाख ५५ हजार ६०० एवढे उद्दिष्ट देण्यात आले आहे. १४ ऑक्टोबरपर्यंत नऊ लाख ९ हजार ३६१ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. त्यात पहिला डोस घेतलेल्यांची संख्या सात लाख ७६ हजार ४१० एवढी तर दोन्ही डोस घेतलेल्यांची संख्या तीन लाख ३२ हजार ९५१ एवढी आहे. शहराच्या काही भागात लसीकरणाला अद्याप प्रतिसाद मिळत नसल्याने महापालिकेने जनजागृती सुरू केली आहे.

दरम्यान लसीकरणाची गती वाढविण्यासाठी मिशन कवच कुंडल राबविण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार शहरातील अनेक खासगी रुग्णालयात लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. या मोहिमेत गेल्या सात दिवसात २९ हजार ८४९ जणांचे लसीकरण करण्यात आले आहे. ११ हजार ५७० जणांनी पहिला तर १८ हजार २७९ जणांनी दुसरा डोस घेतला असल्याचे महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

चाचण्यांची संख्या घटली

कोरोना संसर्गाची दुसरी लाट ओसरल्यामुळे शहरातील चाचण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली आहे. महापालिकेने गुरुवारी (दि. १४) दिलेल्या अहवालानुसार चाचणी केंद्रावर केवळ ११८ एवढ्या चाचण्या झाल्या. त्यात १०५ आरटीपीसीआर तर १३ ॲन्टीजेन चाचण्यांचा समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!