🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात सत्ताधारी आणि विरोधकांकडून सैन्य दलाच्या कामगिरीचा फायदा उठवण्यासाठी चढाओढ लागल्याचे दिसत आहे. भाजपकडून आपल्या सत्ता काळात सर्जिकल स्ट्राईक केल्याचं सांगत प्रचार केला जात आहे. तर आता काँग्रेसने देखील युपीए सत्ताकाळात करण्यात आलेल्या सर्जिकल स्ट्राईकच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
गुरुवारी राजीव शुक्ला यांनी पत्रकारांना संबोधित करताना सर्जिकल स्ट्राइक नेमके कुठे आणि कधी करण्यात आली, याची तपशीलवार माहिती दिली होती. यात एकूण ६ सर्जिकल स्ट्राईक केल्याचा उल्लेख होता. परंतु एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राहुल यांनी मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात तीन सर्जिकल स्ट्राइक झाल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राजीव शुक्ला आणि राहुल गांधी यांच्या आकडेवारीतील तफावत समोर आली आहे.
दरम्यान, कॉंग्रेसने आकडेवारी जाहीर केल्यानंतर भाजपकडून कॉंग्रेसवर जोरदार टीका होत आहे.
कधी झाले काँग्रेसच्या सत्ताकाळात सर्जिकल स्ट्राईक
१ ) 19 जानेवारी 2008
२ ) 30 ऑगस्ट- 1 सप्टेंबर
३ ) 6 जानेवारी 2013
४ ) 27-28 जुलै 2013
५ ) 6 ऑगस्ट 2013
६ ) 23 डिसेंबर 2013
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

