मुंबई : राज्यातील पशुपालन व दुग्ध व्यवसायाच्या प्रगतीसाठी केंद्र शासनाने पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी अंतर्गत १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे. या निधीचा लाभ राज्यातील इच्छुक व्यावसायिक, उद्योजक व संस्थांनी घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनील केदार यांनी केले आहे.
पशुसंवर्धनाबरोबर दूध आणि प्रक्रिया उद्योग, संलग्न पशुखाद्य, मांसनिर्मिती, मुरघास उद्योग आणि प्रयोगशाळा उद्योगांसाठी केंद्र सरकारने १५ हजार कोटींचा निधी राज्य शासनाला दिला आहे. या विविध उद्योगांसाठी ९० टक्के कर्ज आणि ३ टक्के व्याज सवलतीची योजना शासनाने जाहीर केली आहे, अशी माहिती केदार यांनी दिली. केंद्र शासनाने गेल्या वर्षी पशुसंवर्धन पायाभूत सुविधा विकास निधी या नवीन योजनेस मंजुरी दिली. मात्र, या योजनेचा १५ हजार कोटींची निधी या वर्षी देण्यात आला आहे.
या विविध योजनांतर्गत दूध प्रक्रिया, मांसनिर्मिती व प्रक्रिया, पशुखाद्य, टीएमआर ब्लॉक्स, बायपास प्रोटिन, खनिज मिश्रण, मुरघास निर्मिती, पशुपक्षी खाद्य विश्लेषण प्रयोगशाळा या उद्योग व्यवसायांना ९० टक्के कर्ज उपलब्ध केले जाणार आहे. यावर व्याजदरात ३ टक्के सूट देण्यात येणार असल्याचे केदार यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या
- ‘सोशल मीडियाचा गैरवापर रोखण्यासाठी नवे नियम’, मोदी सरकारची संयुक्त राष्ट्रात भूमिका
- ‘जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा देऊनच विधानसभा निवडणुका घ्या’
- ‘मराठा व ओबीसी आरक्षण ही तुमची जबाबदारी, केंद्राकडे बोट दाखवू नका’, पंकजा मुंडेंचा ठाकरेंना इशारा
- दोन्ही काँग्रेसने शिवसेनेला मोठ्या मनाने सांभाळून घेतलंय, हे लक्षात ठेवावे-हसन मुश्रीफ
- ‘तुमचा ५१ वर्षीय युवा नेता निवडणुकीत सतत मार खाऊन दाढीची खुंट वाढवत फिरतोय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

