Share

आधी पक्षातील आमदार सांभाळा, विखे पाटलांचा थोरातांना टोला

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा: गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून कॉंग्रेसवर निशाना साधण्याची संधी सोडली जात नाहीये. कॉंग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी राज्यात आगामी मुख्यमंत्री आघाडीचा होणार, असा विश्वास व्यक्त केल आहे, तर विखे पाटील यांनी मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहण्यापूर्वी आधी पक्षातील आमदार सांभाळा, असा टोला थोरातांना लगावला आहे.

शिर्डी येथे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी गुरुपौर्णिमेच्या पाश्र्वभूमीवर श्रीसाई समाधीचे दर्शन घेतले. पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले, की लोकसभा निवडणुकीत देशातील आणि राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना पुन्हा संधी दिली. राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुतीला मोठे यश मिळेल. नगर जिल्ह्यातील विधानसभेच्या सर्व जागा युतीच जिंकेल, असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे.

कॉंग्रेसने राज्यात जुन्या चेहऱ्यांना मेकअप करून नव्याने पुढे आणले आहे, त्यामुळे काहीही साध्य होणार नाही. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्षांनी आघाडीचा मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहण्यापूर्वी विधानसभा निवडणुकीपूर्वी किती आमदार त्यांच्या पक्षात राहतील. याची काळजी घेतलेली बरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने चांगली कामे केली आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप – शिवसेना युती दोनशे वीस जागा जिंकेल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!