Share

बळीराजाचे अश्रू पुसण्यासाठी राज्यमंत्री सत्तारही जाणार मराठवाडा दौऱ्यावर  

Published On: 

 औरंगाबाद :- नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार हे सोमवार,मंगळवार आणि बुधवारी मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहेत.

दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सत्तार हे सोमवार दि. 19 ऑक्टोबर रोजी सकाळी जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाला भेट देणार आहेत. त्यानंतर बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील पांढरवाडी ,पाडळसिंगी व पाचेगाव येथील नुकसानग्रस्त भागाची पाहणी पाहणी करणार आहेत आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर दुपारी बीड जिल्ह्यातील कुर्ला, शिवनी व पाली या भागांचा दौरा करणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता जिल्हाधिकार्यालय बीड येथे त्यांचे आगमन होणार असून तेथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत.तसेच ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ आणि महा राजस्व अभियान याबाबत आढावा बैठक घेणार आहेत.

मंगळवार दि. 20 ऑक्टोबर 2020 रोजी महसूल राज्यमंत्री सत्तार हे उस्मानाबाद जिल्ह्यातील सिलवडी व सुरडी या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद येथे त्यांचे आगमन होणार असून तेथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेणार आहेत. ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ व महाराजस्व अभियानाचाही आढावा ते यावेळी घेणार आहेत. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम परांडा तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

बुधवार दि. 21 ऑक्टोबर रोजी  सत्तार हे लातूर जिल्ह्यातील निलंगा ,औसा व लातूर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत व शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी जिल्हाधिकारी कार्यालय लातूर येथे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा ते घेणार आहेत. तसेच ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ व महा राजस्व अभियान याबाबतही आढावा घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!