मुंबई : राजस्थानातील आमदारांना विकत घेऊन काँग्रेस सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमवले आहेत. असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.
यासंदर्भात बोलताना सावंत म्हणाले की, केंद्रातील भाजपचे सरकार सत्ता पैसा आणि इन्कम टॅक्स यांचा वापर करून विविध राज्यातील विरोधी पक्षांची सरकारे पाडण्याचा प्रयत्न करत आहे. महाराष्ट्रातील भाजप नेते यासाठी वापरले जात आहेत. कर्नाटकातील काँग्रेस जेडीएसचे सरकार पाडण्यासाठी महाराष्ट्रातील भाजप नेत्यांचा वापर केला गेला आहे.
सावंत म्हणाले की, कर्नाटकच्या आमदारांना भाजप सरकारच्या काळात मुंबईच्या हॉटेलात पोलिस बंदोबस्तात डांबून ठेवले होते. महाराष्ट्रातील भाजपच्या ज्येष्ठ मंत्र्याच्या घरी यासंदर्भातल्या बैठका होत होत्या, हे राज्यातील जनतेने पाहिले आहे. आताही महाराष्ट्रातील भाजप नेत्यांनी बिल्डर आणि व्यावसायिकांकडून ५०० कोटी रूपये जमा करून राजस्थान सरकार पाडण्यासाठी पाठविले आहेत अशी खात्रीशीर माहिती आपल्याला मिळाली असून आपण यासंदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी चर्चा केली आहे.
‘विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सचिन सावंत अशाप्रकारची वक्तव्ये करत असतील’
त्यानंतर आता उर्जामंत्री आणि कॉंग्रेसनेते नितीन राऊत यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. एकीकडे कोरोनाविरुद्ध लढा सुरू असताना भाजपकडून राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे, हे संविधानाला छेद देणारे आहे. राजस्थानमध्ये जे घडलं ते दुर्दैवी आहे. पैसे घेऊन आमदारांना विकत घेण्याचा मी निषेध करतो,’ अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली आहे.
‘महाराष्ट्र सरकार मजबूत आहे. पुढची पाच वर्ष हे सरकार चालेल. मुख्यमंत्री आणि आमचे अध्यक्ष सगळ्या आमदारांशी संपर्कात आहेत. आपण काळजी करू नका देवेंद्रजीच्या हातात काही लागणार नाही,’ असंही नितीन राऊत म्हणाले.
दरम्यान, यशोमती ठाकूर यांनीही फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर टीका केली. भाजपच्या १०५ आमदारांपैकी काही आमदार आमच्या संपर्कात आहेत, असं यशोमती ठाकूर गुरुवारी म्हणाल्या होत्या. भाजपचे आमदार आमच्या संपर्कात आल्याची बातमी बाहेर आल्यामुळे फडणवीसांना दिल्लीला जावं लागल. आम्ही एक आहोत, असं स्पष्टीकरण त्यांना आपल्या पक्षश्रेष्ठींना द्यावं लागलं, असं ठाकूर म्हणाल्या.
वसुंधरा राजेंनी मौन सोडलं, राजस्थानच्या महासंग्रामावर पहिली प्रतिक्रिया…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

