Share

वसुंधरा राजेंनी मौन सोडलं, राजस्थानच्या महासंग्रामावर पहिली प्रतिक्रिया…

Published On: 

जयपूर : गेल्या काही दिवसांपासून राजस्थानातील सत्तासंघर्ष सर्वानी पहिला आहे. अशातच हा राजकीय वाद आता थेट न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. या सर्व नाट्यामागे काँग्रेस पक्षाने भाजप पक्षाला कारणीभूत ठरवले आहे. या सगळ्या प्रकरणावर आता राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या वसुंधरा राजे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “राजस्थानातल्या काँग्रेसमध्ये झालेलं बंड जनतेसाठी दुर्दैवी आहे. काँग्रेस त्यांच्या घरातल्या भांडणाचा दोष भाजपाच्या माथी मारु पाहतंय हे असले प्रकार करणं त्यांनी सोडावं. काँग्रेसच्या अंतर्गत कलहाची किंमत राजस्थानच्या जनतेला मोजावी लागते आहे ही बाब दुर्दैवी आहे.” असं वसुंधरा राजे यांनी म्हटलं आहे.

राजस्थानमध्ये सचिन पायलट यांच्या बंडाला भाजपची फुस असल्याचा आरोप काँग्रेसने केला होता. भाजपकडून काँग्रेसच्या आमदारांना पैशांचे आमिष दाखवले जात असल्याचा दावा काँग्रेस नेते आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला होता. मात्र, वसुंधरा राजे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले. आमच्या राज्यात करोनामुळे ५०० हून अधिक लोक मृत्यूमुखी पडले आहेत आणि जवळजवळ २९ हजार लोक कोरोना पॉझिटिव्ह आहेत. तसेच टोळधाडीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होत आहे. राज्यात महिलांवरील अत्याचारांनी सीमा ओलांडल्या आहेत. राज्यातील वीजेची समस्याही वाढली आहे. पण काँग्रेस मात्र भाजप आणि भाजप नेतृत्वाला दोष देण्याचा प्रयत्न करीत आहे. सरकारने जनतेचे हिताला महत्व दिले पाहिजे. कधी तरी जनतेबाबत विचार करा, असे वसुधंरा राजे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

राष्ट्रवादीच्या ‘या’ बाहुबली नेत्याला झाली कोरोनाची लागण

दरम्यान, भाजपचा मित्रपक्ष असलेल्या आरएलपीचे अध्यक्ष हनुमान बेनीवाल यांनी मात्र वसुंधरा राजे यांच्यामुळेच सचिन पायलट यांचे बंड फसल्याचा आरोप केला आहे. वसुंधरा राजे यांनी सचिन पायलट यांच्यासोबत निघालेल्या अनेक काँग्रेस आमदारांना फोन करुन परत पाठवले. त्यामुळे राजस्थानमधील अशोक गेहलोत यांचे सरकार वाचले, असे बेनीवाल यांनी म्हटले होते.

‘विधान परिषदेच्या निवडणुका जवळ आल्यामुळे सचिन सावंत अशाप्रकारची वक्तव्ये करत असतील’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!