Share

भाजप निवडणूक हरली तरी लोकांना लस मोफतच मिळणार – नवाब मलिक

Published On: 

औरंगाबाद : भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात भाजपने मतदारांना कोरोनाची मोफत लस देण्याचे आश्वासन दिल्यानंतर आता राजकारण तापले आहे. भाजपच्या जाहीरनाम्यात सत्ता आल्यास बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची मोफत लस देऊ, असे आश्वासन देण्यात आले आहे. भाजपकडून गुरुवारी बिहार विधानसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. बिहारमधील प्रत्येक व्यक्तीला कोरोनाची लस मोफत देणे, हे आमचे प्रमुख आश्वासन असल्याचे यावेळी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.

आता यावरून भाजपवर जोरदार टीका केली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी देखील यावरून भाजपचा चांगलाच समाचार घेतला आहे. कोरोना लस भाजप लोकांचे जीव वाचवण्यासाठी देत आहे की निवडणुका जिंकण्यासाठी देत आहे, असा सवाल नवाब मलिक यांनी विचारला आहे. भारतीय जनता पार्टी निवडणूक हरली तरी या देशातल्या लोकांना लस मोफतच मिळणार आहे आणि महाराष्ट्रातील जनतेला ही लस पूर्ण मोफत दिली जाईल, असं स्पष्टच नवाब मलिक यांनी सांगितलं. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

दरम्यान, दुसरीकडे बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाची सत्ता आल्यास मोफत कोरोना लस देण्याचे आश्वासन जाहीरनाम्यात देऊन भाजपाने कोरोना लसीचेही राजकारण केले. सर्व राज्यांना मोफत लस देणे ही केंद्र सरकारची जबाबदारी असताना निवडणुका आहेत म्हणून फक्त बिहारला मोफत लस देणार, मग महाराष्ट्रात निवडणुका नाहीत म्हणून त्यांना कोरोनावरील लस देणार नाही का?, केंद्र सरकार गोरगरिबांकडून कोरोना लसीचे पैसे घेणार आहे का?, असे प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी विचारले होते.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!