Share

‘कोरोनामुळे लोकांना लक्षात आलं की देव वाचवू शकत नाही,तर…’

Published On: 

मुंबई : श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही निमंत्रण दिले जाणार आहे. येत्या ५ ऑगस्ट रोजी भूमिपूजन सोहळा होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासह निवडक ३०० जणांना निमंत्रण पाठवण्याची तयारी सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहतील अशी शक्यता आहे.

कोरोनाचे संकट असताना अयोध्येत राम मंदिर भूमिपूजन सोहळा होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीकास्त्र सोडले होते. राम मंदिर बांधून कोरोना जाईल असे भाजपवाल्यांना वाटत असेल तर हरकत नाही, अशा शब्दांत पवारांनी टीका केली होती. भूमिपूजनाच्या मुद्द्यावरून भाजप व महायुतीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना घेरले आहे. शिवसेनेला कोंडीत पकडण्याची संधी राष्ट्रवादीसोबतच भाजपनेही घेतली असल्याचे सांगितले जाते.

दरम्यान, ‘कोरोनामुळे लोकांना लक्षात आलं की देव वाचवू शकत नाही, तर डॉक्टर हाच खरा देव आहे. अशा अंधश्रद्धांपेक्षा शास्त्रावर लक्ष द्यावे. आमचा देखील रामावर तेवढाच विश्वास आहे. माझ्या मतदारसंघात सर्वात आधी राम मंदिर बांधलं’, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी सांगितलं.

धर्मापेक्षा शास्त्र महत्वाचे. कोरोनामुळे धार्मिक सणांना परवानगी नाही. गणपतीबाबतीत देखील मर्यादा पाळाव्या लागतील, असं जयंत पाटील म्हणाले. ‘राम मंदिर होत असेल तर आमचा विरोध नाही. पण कोरोनाच्या संकटात कोरोनाकडे लक्ष देण्याची गरज आहे. सरकारने कोरोनामुळे लोकांनी एकत्र येऊ नये यासाठी धार्मिक सणांना मर्यादा ठेवण्याचे आदेश दिले आहेत’, असं जयंत पाटील यांनी अधोरेखित केलं.

आज उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राम मंदिर भूमिपूजनाच्या मुद्द्यावर केलेल्या विधानावरही भाष्य केले. ठाकरे म्हणाले, शरद पवार म्हणतात ते बरोबर आहे. मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही. त्यासाठी आपल्याला डॉक्टर्सचीच गरज आहे, असं म्हणत पवारांच्या सुरात सूर त्यांनी मिसळला.उद्धव ठाकरे म्हणाले, ‘शरद पवार म्हणत आहेत ते बरोबर आहे. आपल्याला डॉक्टरांची गरज आहे. आपण ज्या सुविधा निर्माण करतोय त्या कोरोना बरा करणार नाहीत. आपल्याला त्यासोबत डॉक्टर हवे आहेत.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाचा धोका आणखी वाढला : नरेंद्र मोदी पुन्हा एकदा साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद

केंद्राचे पैसे हळूहळू येत आहेत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

पोटदुखी नवं लक्षण असेल, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना जोरदार टोला

अंतिम वर्षाच्या परीक्षा नाहीच, शाळाही सुरु होणार नाहीत – उद्धव ठाकरे

विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको – अमित देशमुख

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!