🕒 1 min read
नवी दिल्ली – कोरोनाचा संसर्ग आणि विषाणूंचं संक्रमण होण्याचा वेग वाढत आहे. 24 तासांस ICMR ने साधारण 4 लाख 20 हजार 898 लोकांची कोरोना चाचणी केली. गुरुवारच्या तुलनेत 68,097 नवीन लोकांची चाचणी करण्यात आली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी 48 हजार 916 नवीन कोरोनाचे रुग्ण आढळल्यानं कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 13,36, 861वर पोहोचला आहे. यापैकी 4 लाख 56 हजार 071 रुग्णांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर 24 तासांत कोरोनामुळे 757 लोकांचा मृत्यू झाल्यानं आतापर्यंत मृतांचा आकडा 31 हजार 358 वर पोहोचली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेत आहेत. पीएम मोदींनी 27 जुलै रोजी ही बैठक बोलावली आहे, या बैठकीत कोरोनाच्या वाढत्या संसर्गावर चर्चा होऊ शकते अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
या बैठकीला गृहमंत्री अमित शाह सुद्धा उपस्थित असतील. याशिवाय केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन सिंह बैठकीत सहभागी होतील. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत राज्यांचे मुख्य सचिव आणि आरोग्य सचिवसुद्धा सहभागी होणार आहेत. अनलॉक 2.0 हा 31 जुलैरोजी समाप्त होत आहे.
महत्वाच्या बातम्या-
पोटदुखी नवं लक्षण असेल, मुख्यमंत्र्यांचा फडणवीसांना जोरदार टोला
अंतिम वर्षाच्या परीक्षा नाहीच, शाळाही सुरु होणार नाहीत – उद्धव ठाकरे
‘मदरशांसाठी कोट्यावधींचा निधी तर कोविड योध्याचे वेतन अजूनही थकलेले’
विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको – अमित देशमुख
“नगरसेवक हरवले आहेत, आजारात सोडलत आता आम्ही मतदान करताना सोडतो!”
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
