🕒 1 min read
बीड : मागील काही दिवसांपासून मराठवाड्यात मुसळधार पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. सोमवारी रात्रभर झालेल्या अतिवृष्टीने बीड, लातूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, परभणी, नांदेड, हिंगोली, जालना अशा सर्वच जिल्ह्यात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर परळी तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भाजपच्या राष्ट्रीय सचिव आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज पाहणी केली. यावेळी पंकजांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्यावर टीकास्त्रांचा वर्षाव केला.
परळीच्या देशमुख टाकळी येथे आज अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली व स्थानिक शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या.
शेतकऱ्यांनी या अस्मानी संकटाचा धैर्याने सामना करावा,अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची सरसकट भरपाई मिळवून देण्यासाठी मी पाठपुरावा करणार आहे। pic.twitter.com/UwqsvbxfOx
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) September 28, 2021
यावेळी बोलतांना त्या म्हणाल्या की,’बीड जिल्ह्यात मोबाईल वाजला मदत आली असं शेतकऱ्यांना वाटायचं. पण आता या सरकारमध्ये कसलीच मदत नाही. कॅबिनेट मंत्र्यांचा बीड दौरा झाला. मात्र, एकाही बांधावर जात त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलं नाही’, अशा शब्दात पंकजा यांनी पाटलांच्या दौऱ्यावर टीका केली आहे.
दरम्यान, काल जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष आणि ५ संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश म्हणजे पंकजा यांना मोठा धक्का मानला जात आहे. परंतु, ते राष्ट्रवादीत गेले हा आपल्याला धक्का नाही. माझी विनंती आहे की त्या प्रश्नांऐवजी शेतकऱ्यांवर चर्चा करावी, असेही त्या म्हणाल्या. तसेच अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असल्याची माहितीही यावेळी त्यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारची ‘स्मार्टफोन’ योजना
- सोमय्यांनी गंभीर आरोप केलेला, भावना गवळींचा निकटवर्तीय असलेला सईद खान आहे तरी कोण?
- ‘काही दिवसांत अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील’
- तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त’ घोटाळ्याची खुली चौकशी सुरू
- बाळासाहेबांपेक्षा आताच्या पक्षप्रमुखांची शपथ घेतली असती, तर…; नितेश राणेंचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
