Share

आनंदाची बातमी : स्वदेशी लशीची मानवी चाचणी सुरु, दिल्लीतील एम्समध्ये 30 वर्षीय व्यक्तीला पहिला डोस

Published On: 

नवी दिल्ली : सध्या दक्षिण ध्रुवापासून उत्तर ध्रुवापर्यंत, वडगाव बुद्रुक पासून वॉशिंगटन पर्यंत सगळे जण एकच प्रश्न विचारात आहेत की कोरोनावर लस कधी येणार. आता याच कोरोनावर लस तयार करण्याचं काम युद्ध पातळीवर सुरु आहे. जगभरात लस तयार करण्यावर काम सुरु असताना भारतीयांना मोठ यश मिळालं आहे.

दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजे AIIMS मध्ये कोरोना वॅक्सिन COVAXIN चं ह्युमन ट्रायल सुरु झालं आहे. वॅक्सिनचा पहिला डोस 30 वर्षीय व्यक्तीला देण्यात आला आहे. भारत बायोटेक ही कंपनी हे वॅक्सिन तयार करत आहे. पहिल्या टप्प्यात 375 व्हॉलिंटियर्सना हे वॅक्सिन दिलं जाणार आहे. दिल्लीतील एम्समध्ये 100 व्हॉलिंटियर्सवर ट्रायल होणार आहे. यापैकी 50 जणांना सध्या वॅक्सिन दिली जाणार आहे.

शरद पवारांच्या पायाला पुन्हा भिंगरी; नाशिक, सोलापूर नंतर पवारांची स्वारी औरंगाबादला

पहिला डोस दिलेल्या व्हॉलिंटियरला रुग्णालयात निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्यानंतर घरी पाठवण्यात येणार आहे. पुढचे सात दिवस त्याच्यावर लक्ष ठेवण्यात येणार आहे. COVAXIN व्हॅक्सिनचा हा पहिलाच डोस आहे. सुरुवातीच्या टेस्टनंतर या 30 वर्षीय व्यक्तीला वॅक्सिनच्या पहिल्या डोससाठी निवडण्यात आलं होतं. एक हजारहून अधिक जणांनी व्हॉलिंटिअर बनण्यासाठी संपर्क साधला होता.

हैदराबादमधील भारत बायोटेक कंपनीकडून COVAXIN लस तयार केली जात आहे. या कंपनीला आयसीएमआर आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजीकडूनही मदत केली जात आहे. COVAXIN च्या ट्रायलसाठी आयसीएमआरने देशभरात निवडलेल्या 12 ठिकाणांची निवड केली आहे. यापैकी दिल्लीतील एम्स एक ठिकाण आहे. दुसऱ्या टप्प्यात सर्व 12 ठिकाणांवरील एकूण 750 जणांवर लसीची चाचणी केली जाणार आहे.

२१ ऑगस्ट पर्यंत महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यात प्रत्येक शनिवार, रविवारी राहणार कडक ‘कर्फ्यु’

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!