Share

ऑरेंज आर्मीच्या चाहत्यासाठी खुशखबर; केन विलियमसन लवकरच संघात परतन्याचे दिले संकेत

Published On: 

मुंबई : आयपीएलची स्पर्धा आतापर्यंत सर्व संघासाठी समिश्र राहिली आहे. मात्र याला एक दोन अपवाद आहे. पहिला अपवाद आरसीबी संघाचा कारण आरसीबी संघाने एकही सामना गमावला नाही आणि ते गुणतालीकेत ते पहिल्या स्थानावर विराजमान आहे. तर दुसरा अपवाद आहे हैदराबाद सनरायझर्स या संघाचा, कारण हैदराबाद संघ सलग दोन सामने गमावत गुणतालीकेत आठव्या क्रमांकावर आहे.

हैदराबादच्या संघातील महत्वाचा खेळाडू केन विलियमसन हा दुखापतीतून सावरत असून लवकरच पुनरागमन करेल अशी माहिती हैदराबाद सनरायझर्सच्या संघ व्यवस्थापनाने दिली आहे. हैदराबाद सनरायझर्सने केन विलियमसनचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, या व्हिडीओत केन म्हणतो की ‘मी सध्या माझे संपुर्ण लक्ष्य बरे होण्यावर आहे आणि यासाठी मी योग्य प्रगती करत आहे. आशा करतो की एका आठवड्यात मी तंदुरुस्त होईल’. असे म्हणाला.

https://twitter.com/SunRisers/status/1382995991066865672

केन विलियमसनच्या डाव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली आहे. याच दुखापतीमुळे केन न्यूझीलंडमध्ये मागील महिन्यात झालेल्या बांगलादेश विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला मुकावे लागले होते. तसेच तो हैदराबादच्या पहिल्या दोन सामन्यातही खेळू शकला नव्हता. हैदराबादची मधल्या फळीतील फलंदाज अपयशी ठरत असल्याने हैदराबादच्या चाहत्यांना केनच्या पुनरागमनाची प्रतिक्षा आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!