औरंगाबाद : महाविकास आघाडीचे सरकारमध्ये मंत्री असलेल्या संदीपान भुमरे यांच्यासह चार ते पाच जणांनी पैठण नगर परिषदेच्या हद्दीत असलेला तब्बल ३० कोटी रुपयांचा भूखंड लाटल्याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्याने केली होती. याप्रकरणी ‘महाराष्ट्र देशा’ शी बोलताना विभागाचे अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी चौकशीअंती कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील पैठणचे माजी नगराध्यक्ष दत्तात्रय गोर्डे यांनी दि. ५ रोजी नगर परिषदेच्या सर्वे नंबर १०२६ मधील तब्बल ३० कोटींचा भूखंड मंत्री संदीपान भुमरे, त्यांचे चिरंजीव विलास भुमरे, माजी नगराध्यक्ष सोमनाथ परदेशी त्यांच्या पत्नी ललीता परदेशी यांनी संगनमत करून हाडपल्याची तक्रार दिली होती. त्या तक्रारीचा पाठपुरावा करत ‘महाराष्ट्र देशा’ ने लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांना तक्रारी संदर्भात विचारणा केली.
यावेळी ते म्हणाले कि, या प्रकरणात प्राप्त झालेल्या तक्राराची चौकशी सुरु करण्यात आली आहे. यासाठी वरिष्ठांकडे प्रकरण देखील पाठविण्यात आले आहे. सध्या चौकशी सुरु असल्यामुळे या प्रकरणावर जास्त भाष्य योग्य नसून चौकशीअंती जे समोर येईल त्या अनुषंगाने कारवाई करण्यात येईल. दरम्यान, या प्रकरणावर भाजपचे स्थानिक पदाधिकारी गप्प असून कोणीही बोलण्यास तयार नाही.
महत्वाच्या बातम्या
- ‘दुबार पेरणीचे संकट; शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची भरपाई द्या’, आ.दानवेंची ठाकरे सरकारकडे मागणी
- ‘काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे महाराष्ट्रातील पप्पू!’, चंद्रकांत पाटील यांचा टोला
- ‘तोल सांभाळा! नाहीतर महाराष्ट्रातही काँग्रेस अशीच कोसळेल’, ‘त्या’ घटनेवरून भाजपचा सल्ला
- ‘उस्मानाबाद-तुळजापूर-सोलापूर रेल्वे लाइनचे प्रस्ताव चार टप्प्यांत द्या’, खा.ओमराजेंच्या सूचना
- मंत्री वर्षा गायकवाड यांच्या कारला टेम्पोची धडक, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

