Share

राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही, अस्लम शेख यांचे कडक लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत

Published On: 

🕒 1 min read

जालना : कोविडचे अनर्थचक्र थांबवायचे असेल आणि झपाट्याने वाढणारा संसर्ग थोपवायचा असेल तर काही काळासाठी का होईना पण कडक निर्बंध लावावेच लागतील, विरोधी पक्षनेत्यांनी केलेल्या सूचनांचाही निश्चितपणे विचार केला जाईल. मात्र सर्व पक्षांनी एकमुखाने याबाबतीत राज्य सरकार घेत असलेल्या निर्णयांना सहकार्य करावे व लोकांमध्ये जागृती निर्माण करावी. ही लढाई कोरोनाने आपल्यावर लादलेली असून लोकांच्या जीवाला पहिले प्राधान्य द्यावेच लागेल असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल झालेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीत संपूर्ण लॉकडाऊनचे स्पष्ट संकेत दिले आहेत.

या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात लॉकडाऊन शिवाय पर्याय नाही. कोरोना रोखायचा असेल तर लॉकडाऊन अटळ आहे. अनेक देशांमध्ये लॉकडाऊन लागू आहे. महाराष्ट्रात संख्या जास्त असूनही व्यापारी, गरिबांचा विचार करत आहोत. त्यामुळे सगळ्यांचं एकमत घेऊन पुढची दिशा निश्चित करायची आहे. असे अस्लम शेख म्हणाले आहेत.

गरिबांसाठी विरोधी पक्षाची जी मागणी आहे ती योग्य आहे. आमचीही याबाबत मागणी आहे. केंद्र सरकारने चांगले पॅकेज द्यावे. अशी मागणी शेख यांनी केली आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातच का रुग्ण आढळत आहेत? याबाबतही शोध घ्या. काहीच्या राज्यांमध्ये निवडणुका होताहेत. लाखो लोक जमत आहेत. पंतप्रधान मोदी लाखोंना संबोधित करत आहेत. मग मुंबई आणि महाराष्ट्रात कसे रुग्ण वाढत आहेत. मराठी माणसाची रोगप्रतिकार क्षमता कमी झाली की आणखी दुसरं कारण आहे? ते शोधण्याबाबत टास्क फोर्सला सांगितलं आहे. असा टोला देखील अस्लम शेख यांनी लगावला आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!