Share

औरंगाबादेत एमआयएमला धक्का, मनपा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद : औरंगाबाद महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एमआयएमला मोठा फटका बसला आहे. एमआयएमच्या माजी नगरसेविकेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत एमआयएमच्या माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. गेल्या काही दिवसात एमआयएममधून राष्ट्रवादीत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढताना दिसून येत आहे.

माजी नगरसेविका साजेदा सईद फारुकी आणि सईद फारुकी यांनी राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधले आहे. अलिकडेच एमआयएमच्या दोन नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकला होता. महापालिका निवडणुकांच्या आधीच एमआयएममध्ये गळती सुरु झाली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकांमध्ये एमआयएमला झटका बसण्याची शक्यता आहे. पक्षविरोधी काम तसेच अंतर्गत गटबाजी पाहता एमआयएम येणाऱ्या मनपा निवडणुकीत नव्या चेहऱ्यांना अधिक संधी देणार असल्याचे बोलले जात आहे.

एमआयएमचे पक्ष प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या सूचनेनुसार दहा नगरसेवकांना पुन्हा तिकिट दिले जाणार नाही. लवकरच मनपा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शहरात सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. दररोज नवनवीन पक्षप्रवेश होताना दिसून येत आहेत. तिकीटासाठी अनेक जण इकडून तिकडे तिकडून इकडे जातांना दिसत आहेत. काँग्रेस पक्षातही मोठ्या प्रमाणात प्रवेश होतांना दिसून येत आहेत. निवडणुकांच्या अनुषंगाने राजकीय वातावरण तापले असून अनेक समीकरणेही बदलत चालली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!