Share

बोरगांव बाजार येथे लाखोंचे पेयजल सेवा मशिन धुळखात पडुन

Published On: 

औरंगाबाद : बोरगांव बाजार येथील ग्रामपंचायतीने बसविलेले लाखो रुपये किमतीचे पेयजल सेवा मशिन अनेक महिन्यापासुन ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षमुळे धुळखात पडुन आहे.
बोरगांव बाजार येथील ग्रामपंचायतीच्या वतीने गावक-यांना शुद्ध पेयजल पाणी मिळावे या चांगल्या उद्देशाने मागील तीन चार वर्षापुर्वी ग्रामपंचायतच्या तर्पâ शुद्ध पेयजल सेवेचे थाटात उद्घाटन करण्यात आले होते

या पेयजल योजनेमुळे खाजगी पेयजला पेक्षा ग्रामपंचायतीचा एक जार सात रुपयांना मिळत असल्यामुळे गावक-यांना आर्थिक बचत व चांगले आरोग्य या दोन गोष्टींचा फायदा होत होता. याचबरोबर गावक-यांना या पेयजल जारच्या पाण्याची सवय लागलेली. मागील तीन चार महिन्यापासुन ग्रामपंचायतच्या दुर्लक्षमुळे लाखो रुपये किमंतीचे पेयजल मशीन बंद आहे.

त्याचबरोबर गावक-यांना पेयजल पाण्याची सवय लागल्यामुळे खाजगी जार विक्री करणा-यांकडुन २० रुपयामध्ये एक जारचे पाणी घ्यावे लागत आहे. ग्रामपंचायतचे पेयजल मशीन बंद असल्यामुळे याचा मोठा फायदा खाजगी जार विक्री करणारे करुन घेत आहेत. तरी सबंधीत ग्रामपंचायत प्रशासनाने या लाखोरुपयांच्या बंद पडलेल्या पेयजल जार मशिनची त्वरित दुरूस्त करावी अशी मागणी गावक-यांतुन होत आहे.

महत्त्वाच्या बातम्या    

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!