🕒 1 min read
हिंगोली : जिल्ह्यातील वसमत शहरातील छत्रपती शिवरायांच्या अश्वरुढ पुतळ्याची राष्ट्रवादीचे आमदार राजू नवघरे व शिवसेना नेते जयप्रकाश मुंदडासह काहींनी शिवरायांच्या पुतळ्यावर चढून विटंबना केली. सदरील फोटो व व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर आ. नवघरेंनी शिवभक्तांची माफीही मागितली होती. आता शिवसैनिक केलेली विटंबना पुसून टाकण्यासाठी शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचा दुग्धाभिषेक करणार आहेत. या कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
शिवसेनेचे हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील व शिवसेना कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्यासह शेकडो शिवसैनिक या कार्यक्रमाला उपस्थित रहाणार आहेत. दुग्धाभिषेक, जलाभिषेक करण्यासाठी पंचगंगा नदीचे पाणी आणण्यात आले आहे. या कार्यक्रमादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
वसमत शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारुढ पुतळ्याचे विराजमान करण्यात येणार आहे. पुतळा शहरात आणल्यानंतर कार्यकर्त्यांनी शहरातून मोठी रॅली काढली होती. यादरम्यान पुतळ्यावर पुष्पवृष्टी करण्यासाठी आमदार राजू नवघरे व शिवसेना नेते जयप्रकाश मुंदडा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर चढून पुष्पहार अर्पण केला. याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाचा राज्यभरातून शिवसैनिकांनी संताप व्यक्त केला. आमदार राजू नवघरेंचा राजीनामा देण्याची मागणीही शिवभक्तांनी केली होती.
महत्वाच्या बातम्या
- आगामी महापालिका निवडणूकांसंदर्भात गडकरी आणि फडणवीस यांच्यात चर्चा
- ३७० कलम रद्द करुनही काश्मीरप्रश्न सुटलेला नाही- मोहन भागवत
- ‘कारवाई करणार असेल तरच यावं अन्यथा…’; उदयनराजेंचे ईडीला पुन्हा एकदा आव्हान
- कुणी ‘शेण खा’ म्हटलं तर तू खातोस का? शिवसेना आमदारांचा राष्ट्रवादीच्या आमदाराला खोचक सवाल
- मोदींची घोषणा! अयोध्येच्या तीर्थयात्रेसाठी भाजप सरकार ५० हजारांची आर्थिक मदत करणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
