🕒 1 min read
मुंबई: अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकिता कोंवर यांच्या लग्नामुळे बरीच चर्चा रंगली होती. या दोघांच्या वयाच्या फरकामुळे त्यांना सोशल मिडीयावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. मात्र सध्या हे दोघे देखील सोशल मिडीयावर सक्रीय असतात. नुकतेच मिलिंद सोमण याने पत्नी अंकिता कोंवरने आपल्या आयुष्यातील दु:खद अनुभव शेअर केला आहे.
अंकिताने इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर केला असून तिच्या आयुष्यातील कटू अनुभव सांगितला आहे. यात ती म्हणाली की, लहानपणी माझा छळ झाला, मी वसतिगृहात वाढले. परदेशात एकटी राहत होते. तेथे ज्यांच्यावर मी विश्वास ठेवला त्यांनी माझा विश्वासघात केला.
मी माझा एक भाऊ गमावला, माजी प्रियकर गमावला, वडील गमावले. माझ्या दिसण्यावरून मला अनेक नावांनी हाक मारली जात होती. आता मी ज्याच्यावर प्रेम करते त्याच्यासोबत असण्यावरून लोक मला जज करतात. स्वत: वर प्रेम करा, असं तिने या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितले आहे.
https://www.instagram.com/reel/CT9xUMdIBEb/?utm_source=ig_web_copy_link
यावर मिलिंद सोमण कमेंट करत म्हणाला की, बेबी, तू आता त्यातून खूप पुढे आली आहेस. त्यावर रिप्लाय देताना अंकिता म्हणाली की, शुक्रिया मेरे साथी. सध्या अंकिताच्या या पोस्टवर अनेकांनी तिला पाठिंबा दर्शवला आहे.
अंकिता आणि मिलिंद सोमण यांचे 22 एप्रिल 2018 रोजी अलिबागमध्ये लग्न झाले. या खाजगी समारंभात फक्त जवळचे लोक उपस्थित होते. अंकिता आणि मिलिंद यांचे जुलै 2019 मध्ये स्पेनमध्ये लग्न झाले होते. अंकिता आणि मिलिंद दोघांनाही फिटनेसची आवड आहे. ते दोघेही सोबत वर्कआउट करताना दिसतात.
महत्त्वाच्या बातम्या
- सोमय्यांच्या रडावर आता ठाकरे कुटुंबीय; अलिबागला जाऊन रश्मी ठाकरेंच्या बंगल्यांची पाहणी करणार
- मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून किरीट सोमाय्यांवर होत असलेली कारवाई थांबवायला हवी होती – फडणवीस
- ‘सोमय्या फक्त साधन, खरे मास्टरमाईंड चंद्रकांत पाटीलच’, हसन मुश्रीफांचा आरोप
- चंद्रकांत पाटलांकडून मला भाजपात येण्यासाठी ऑफर; हसन मुश्रीफांचा गौप्यस्फोट
- कुटुंबांवर केलेले आरोप बिनबुडाचे, सोमय्यांच्या सीए पदवीवरच मला शंका-हसन मुश्रीफ
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
