मुंबई : फिटनेसमुळे नेहमीच चर्चेत असणारा अभिनेता मिलिंद सोमण. मात्र बऱ्याचदा त्यांच्या हटके व्हिडिओमुळे देखील चर्चेत असतो. नुकताच मिलिंद सोमण यांची पत्नी अंकिताने दोघांचा रोमँटिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यास चाहत्यांनी मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या असून सर्वांचे लक्ष वेधत आहे.
मिलिंद सोमण आणि पत्नी अंकिताच्या जोडीला दोघांमधील वयाच्या अंतरामुळे अनेकदा ट्रोल केले गेले असले, तरी त्यांची जोडी मात्र खुपच सुंदर दिसते. मिलिंद सोमण आणि अंकिता २०१८ मध्ये विवाहबंधनात अडकले, त्यावेळी मिलिंद ५२ तर, अंकिता अवघ्या २६ वर्षांची होती. म्हणजे दोघांच्या वयात तब्बल २६ वर्षाचं अंतर आहे. मिलिंद आपल्या फिटनेससाठीही ओळखले जातात. ते ५४ वर्षांचे असले, तरी त्यांची फिटनेस वाखण्याजोगी आहे.
https://www.instagram.com/reel/CU-ATMfo6rY/?utm_medium=copy_link
नुकतेच या दोघांचा समुद्रकिनारी रोमांन्स करतानाचा हटके व्हिडिओ समोर आला आहे. अंकिताने हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही समुद्रकिनारी एकमेकांसोबत वेळ घालवताना दिसून येत आहेत.अंकिताने शेअर व्हिडिओमध्ये, मिलिंद अंकिताला मिठीत घेऊन फिरवताना दिसत आहेत. अंकिताही मिलिंद यांच्या प्रेमात बुडालेली दिसून येत आहे. व्हिडिओच्या शेवटी मिलिंद अंकिताला मिठीतून खाली उतरवत दिसत आहे. या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये ए आर रेहमानचं गाणं वाजत आहे. या व्हिडिओला चाहत्यांनी भरपूर कमेट केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- मोदी सरकारमधील महत्त्वाच्या समितीवर खासदार इम्तियाज जलील यांची फेरनिवड!
- सिंघू बॉर्डरवर हत्या करणारा सरवजीत म्हणतो, “मला अजिबात पश्चाताप होत नाही”
- ‘अजित पवार आणि त्यांच्या निकटवर्तीयांची बुधवारी आणखी एक पोलखोल करणार’
- ‘योगी आदित्यनाथ यांना लाज वाटली पाहिजे’, ओवैसींचा हल्लाबोल
- ‘नातेवाईकांचीही चौकशी, त्यांना त्रास देणे हे बरोबर नाही’, गृहमंत्री वळसे पाटलांची प्रतिक्रिया
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

