Share

मिलिंद एकबोटेंची अटक पूर्व जामिनासाठी कोर्टात धाव

Published On: 

🕒 1 min read

पुणे: कोरेगाव भीमा दंगली प्रकरणी समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांनी अटक पूर्व जामिनासाठी पुणे सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणी सोमवारी सुनावणी होणार असल्याची माहिती एकबोटे यांचे वकील अॅड. घाटे यांनी दिली आहे.

१ जानेवारी रोजी कोरेगाव भीमा येथे झालेल्या दंगली प्रकरणी संभाजी भिडे आणि समस्त हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. अॅट्रॉसिटी, खुनी हल्ला, दंगल, हत्यारबंदी कायदया अंतर्गत पिंपरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पुढे तपासासाठी हा गुन्हा शिरूर पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.

या घटनेला १५ दिवस उलटूनही एकबोटे आणि संभाजी भिडे यांच्यावर अटकेची कारवाई होत नसल्याने राजकीय नेत्यांकडून सरकारवर टीका करण्यात येत होती . दरम्यान या दोघांना अटक न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!