Share

हडपसरमध्ये अडकलेल्या बिहारच्या नागरीकांनी मानले मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे आभार

Published On: 

पुणे : कोरोनामुळे देशभरात २१ दिवसांचे लॉक डाऊन व रोगाच्या भितीने कामगार, नोकरदार, बॅचलर , इतर राज्यातील नागरिक हे गावाकडे परतण्यासाठी गडबड करत मिळेल तस, जमेल तस, अगदी पायी, दुधाच्या टँकर मधुन ,रुग्णवाहिकेतून प्रवास करत असल्याचे गेले आठवडा भर राज्यासह संपूर्ण देशात दिसून येत आहे.

पुण्यात सर्व प्रथम कोरोनाचा रुग्ण आढळला होता. विविध ठिकाणी परप्रांतीय मजूर, कामगार हे लॉक डाऊन मुळे अडकून पडले आहेत. राज्यपाल, मुख्यमंत्री यांसह अनेक नेत्यांनी घाबरून न जाता असेल त्या ठिकाणी सुरक्षित राहण्याचे आवाहन केले होते, तसेच लागेल ती सोय करण्याचे आदेश देखील काढण्यात आले होते. असेच काही बिहारचे नागरिक पुण्यात हडपसर भागवतुल फुरसुंगी येथे अडकले आहेत. मागील २ दिवसांपासून हे नागरिक हे अन्नावाचून गैरसोयीत होते. त्यांची जेवणाची देखील सोय नसल्याने त्यांनी बिहारचे शिवसेना राज्यप्रमुख कौशलेंद्र शर्मा यांच्याशी संपर्क साधून परिस्थिती सांगितली. त्यांनी शिवसेनेचे उपशहरप्रमुख किरण साळी यांना कळविले असता त्यांनी युवासेना उपजिल्हाधिकारी शादाब मुलाणी यांच्याशी संपर्क साधला.

त्यांनी सहकार्यासोबत तातडीने जाऊन, पुढील १५ दिवस पुरेल इतक्या अन्नधान्याचा साठा उपलब्ध करून दिला, त्यावेळी या नागरिकांना अश्रू अनावर झाले व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे देखील आभार मानले. यावेळी शादाब मुलाणी, निलेश पवार, रुपेश मोरे, मयुरेश जाधव, आकाश खैरे, मयुर शिंदे आदी सहकारी उपस्थित होते.

दरम्यान आज पुण्यात कोरोना बधिताचा पहिला मृत्यु झाला. राज्यात कोरोनाबाधितांची संख्या हि २०० हुन अधिक झाली असून देशात एकूण ३० तर राज्यात ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!