Share

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला विलीनीकरणाने पक्षाची ताकद वाढेल – सुशीलकुमार शिंदे

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा : गेल्या काही दिवसांपासून कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अनेक नेत्यांनी पक्षाला रामराम ठोकून भाजप शिवसेनेत प्रवेश केला. पक्षाकडून त्यान उमेदवारीही मिळाली. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाची गरज असून, माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे, अशी प्रतिक्रिया माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिली. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन येवेली ते बोलत होते.

ते म्हणाले, ” शरद पवार हे ८० व्या वर्षी पक्षाला वाचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. आता माझंही वय झालेले आहे. आम्ही थकलो आहोत. त्यामुळे काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाची गरज आहे. ” मात्र शिंदे यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी टीकेची झोड उठविली आहे.

इतर पक्षातील नेत्यांनीही त्यांना वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यानंतर बुधवारी शिंदे यांनीपुन्हा आपली प्रतिक्रिया दिली आहे. ”काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या वक्तव्यावर मी ठाम आहे. आम्ही आता थकलेले आहोत. माझे हे वक्तव्य पूर्णपणे वैयक्तिक आहे. याचा अर्थ भाजप किंवा मोदी यांना टक्कर देण्यासाठी आम्ही थकलेलो नाहीत. सत्ताधाऱ्यांना लढा देण्यासाठी आम्ही अजून जवान आहोत. देश व राज्यातील स्थिती पाहता अनेकजण काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसला सोडून गेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस वाचविण्यासाठी शरद पवार हे या वयातही कष्ट घेत आहेत. काँग्रेसमध्येही माझ्याप्रमाणे इतर अनेक ज्येष्ठमंडळींचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष बळकट होण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे विलीनीकरण झाले तर आमची ताकद वाढेल असे आजही मला वाटत आहे.” असे ते यावेळी म्हणाले.

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठी यांनी त्यांचे मत व्यक्त केले आहे. ते म्हणले की , काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस एक झाल्यास दोन्ही पक्षांची ताकद वाढेल हे खरे आहे. शिंदे यांची विलीनीकरणाबाबत जी भावना व्यक्त केली ती चांगली आहे. पण ज्या मुद्यावरून शरद पवार बाहेर पडले आहेत ते पाहता सद्यस्थितीत असं घडणं फार कठीण आहे.”

 

महत्त्वाच्या बातम्या :

https://twitter.com/Maha_Desha/status/1182253155045793792?s=20

 

https://twitter.com/Maha_Desha/status/1182253515969720320?s=20

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!