🕒 1 min read
मुंबई : इंडियन प्रिमियर लिग ही क्रिकेटजगतातील सर्वात लोकप्रीय क्रिकेट लीग आहे. या लिगमध्ये जगभरातील दिग्गज क्रिकेटपटु एकत्र येत एका संघात खेळतात. यात अनेक विदेशी खेळाडूंचे भारतीय चाहते बनतात. अनेक विदेशी क्रिकेटपटू भारतीय चाहत्यांचे प्रेम पाहुन भारावून गेलेले आहेत. अनेकदा त्यांनी याबद्दल जाहिरपणे बोलुन दाखवले आहे.
अशाच एका चाहत्याचा किस्सा सध्या सोशल मीडीयावर व्हायरल होत आहे. मुळचा न्युझीलंडचा खेळाडू असलेला मुंबई इंडियन्सचा जेम्स निशमला चक्क एका पाकिस्तानी अभिनेत्रीने मागणी घातली होती. ही घटना २०१९ मधील आहे. पाकिस्तानी अभिनेत्री सेहेर शिंवारीने निशमच्या एका ट्विटला उत्तर देताना तु माझ्या मुलांचा बाबा होशील का? असे सरळ सरळ विचारत लग्नाची मागणी घातली. यावर निशमने प्रतिक्रीया देताना म्हणाला की,’मला खरच वाटते की इमोजीची कधी कधी गरज नसते’ अशी मजेशीर प्रतिक्रीया दिली आहे.
Jimmy would you like to be daddy of my future kids ????????
— Sehar Shinwari (@SeharShinwari) August 28, 2019
आयपीएल स्पर्धे कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अर्ध्यातच स्थगित करण्यात आल्यानंतर निशम मायदेशी परतला आहे. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत निशमला केवळ एका सामन्यात खेळण्याची संधी मिळाली. यात दोन षटके गोलंदाजी करताना त्याने २४ धावा दिल्या होत्या. मात्र निशमला एकही गडी बाद करता आला नाही. नीशमने न्यूझीलंडकडून ६६ एकदिवसीय सामन्यात २८ च्या सरासरीने ६ अर्धशतकासह १३२० धावा केलेल्या आहेत. तर ३१ च्या सरासरीने ६८ गडी बाद केले आहे १२ कसोटी सामन्यात ३३ च्या सरासरीने ७०९ धावा केल्या आहेत. तर गोलंदाजी करताना १४ गडी बाद केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आयपीएल युएईमध्येच असायला हवी होती’ ; साहाची IPL च्या बायो-बबलवर टीका
- ‘बॅटिंग क्रमवारीत वारंवार बदल करण्यात आल्यामुळे माझे करिअरचे नुकसान झाले’
- …तर आयपीएल स्पर्धा ही सय्यद मुश्ताक अली करंडकप्रमाणे भासेल, वृद्धीमान साहाने व्यक्त केले मत
- विराटने केली होती माजी महिला क्रिकेटपटुला आर्थिक मदत; नुकतेच झाले क्रिकेटपटुच्या आईचे निधन
- ‘राऊत, बोलताना भान ठेवा; मविआच्या नावाने मागच्या दिड वर्षापासून महाराष्ट्राला ब्लँक फंगस लागलाय’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

