Share

‘आयपीएल युएईमध्येच असायला हवी होती’ ; साहाची IPL च्या बायो-बबलवर टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही काही दिवसांपासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे. या दरम्यान भारतात आयपीएल स्पर्धा सुरु होती. स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने शिरकाव केल्याने स्पर्धा मध्येच स्थगित करण्याची नामुष्की बीसीसीआयवर आली.

यातच टीम इंडियाचा यष्टिरक्षक ऋद्धिमान साहाला दोन वेळा कोरोनाची लागण झाली होती. आयपीएल -14 दरम्यान त्याला कोरोनाची लागण झाली. यानंतर आता ऋद्धीमान साहाने आयपीएलच्या बायो-बबलवर प्रश्न उपस्थित केले आहेत. भारतात तयार करण्यात आलेला बायो-बबल युएईच्या तुलनेत अभेद्य नव्हता, असं साहा म्हणाला आहे.

पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत साहा म्हणाला, ‘आयपीएल युएईमध्येच झाली असती तर चांगलं झालं असतं. याबाबतचा निर्णय घेणं संबंधितांचं काम आहे, पण मागच्यावेळी युएईमध्ये आयपीएल झाली, तेव्हा तिकडे ट्रेनिंगसाठी एकही व्यक्ती उपस्थित नव्हती, मैदानाचे कर्मचारीही नाही.’ ‘भारतामध्ये सरावादरम्यान लोकं उपस्थित असायची. मुलं भितींवरून पाहायची. मी जास्त टिप्पणी करणार नाही, पण 2020 सालची आयपीएल आरामात झाली, पण भारतात स्पर्धा सुरू झाली तेव्हा रुग्ण वाढले,’ असं वक्तव्य साहाने केलं.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!